आजादी का अमृत महोत्सव कॅम्पियन इंडिया अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे भारतभर घरपोच पिक विमा पॉलिसी वितरण महाअभियान मेरी पॉलिसी मेरे हात हे अभियान सुरू केले आहे.
या अभियानामध्ये भारतातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठी खाजगी इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी सहभागी होत असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीने शासनाच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांसाठी अधिक चांगली आर्थिक बाजू उभारण्यासाठी भूमिका पार पाडण्याचा देखील कंपनीचा निर्धार आहे. हा उपक्रम परिणामकारकपणे राबवता यावा यासाठी पी एम एफ बी वाय अंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पिक विमा पॉलिसी बद्दल माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत तसेच गाव पातळीवर खास शिबिरे स्थापन केली आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तसेच विमा संरक्षण दिले जाणारे पिके आणि हप्त्याची रक्कम त्याबद्दल थेट माहिती मिळणार आहे.
या अभियानांतर्गत या कंपनीतर्फे शेतकऱ्यांना त्यांच्या पॉलिसींचे कागदपत्र देखील वितरित करण्यात येणार आहेत त्यामुळे क्लेम सेटलमेंट विनाअडथळा करणे सोपे होईल. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या थेट कंपनीला सांगण्यासाठी शेतकऱ्यांना एक व्यासपीठ देखील उपलब्ध होईल. याबद्दल बोलताना कंपनीचे सीईओ राकेश जैन म्हणाले की, आम्ही या उपक्रमाचे स्वागत करतो आणि या असामान्य उपक्रमाबद्दल आमचे विस्तृत सहकार्य देत आहोत. शेती व्यवसाय जवळजवळ लोकसंख्येच्या 60 टक्के लोकांना उपजिवीका पुरवतो. पण शेतीव्यवसायाला नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होते त्यामुळे जोखीम, नैसर्गिक आपत्ती मुळे झालेले नुकसान तसेच शेता पिकांना लागणारी कीड व रोग यामुळे शेती क्षेत्र अत्यंत अस्थिर झाले आहे.
त्यामुळे अशा घटना पासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली. मेरी पॉलिसी मेरे हाथ या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारने या प्रयत्नांना मध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे.या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा बद्दल जागरूककरण्यात येत असून पीक विमा पॉलिसी घरपोच देण्यात येत आहे.
Published on: 28 February 2022, 12:02 IST