News

रब्बी हंगामातील ज्वारी, आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा एक रुपयात पीकविमा भरण्यासाठी केंद्राकडून 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली असून आता 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवसात पिकांचा विमा भरता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Updated on 03 December, 2023 12:42 PM IST

रब्बी हंगामातील ज्वारी, आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा एक रुपयात पीकविमा भरण्यासाठी केंद्राकडून 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली असून आता 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवसात पिकांचा विमा भरता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीटरव्दारे शेतकऱ्यांना याविषयी आवाहन केले आहे. ते म्हणाले की, रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती, मात्र काही शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा भरू शकले नाहीत, याचा विचार करून केंद्राकडे विनंती केली असता, दि. 4 व 5 डिसेंबर या दोन दिवसात वरील पिकांचा विमा भरता येणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

पिकांचा विमा भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपली होती. मात्र पिक विमा पोर्टल मधील काही समस्यांमुळे विमा योजनेत भाग घेऊ इच्छिणारे शेतकरी योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले होते. त्यांना भाग घेण्याची संधी देण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवसांसाठी पीक विमा पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

English Summary: Relief for farmers! This is the last date to participate in Fruit Insurance Scheme
Published on: 03 December 2023, 12:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)