News

सध्या भाज्यापालांचे दर दिलासादायक मिळत असल्याने शेतकरी चिंतामुक्त दिसत आहेत. एवढेच नाहीतर आता बाजरीचे दर देखील वाढले आहेत. बाजरीची भाकर सुद्धा सध्या महाग झाली आहे.

Updated on 04 October, 2022 3:07 PM IST

सध्या भाज्यापालांचे दर दिलासादायक मिळत असल्याने शेतकरी (farmers) चिंतामुक्त दिसत आहेत. एवढेच नाहीतर आता बाजरीचे दर देखील वाढले आहेत. बाजरीची भाकर सुद्धा सध्या महाग झाली आहे.

बाजरीचे सध्याचे दर

बाजरीचा (millet) सध्या भाव (price) वाढून तब्बल 2 हजार 700 प्रतिक्विंटल झाले आहेत.विशेषता हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजरीला मोठी मागणी आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सततच्या पावसामुळे बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे.

दिलासादायक! सौर पंपासाठी तब्बल १५ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर

याचा परिणाम राज्यातील (state) विविध भागातून येणाऱ्या बाजरीवर झालेला दिसून येत आहे. पावसामुळे बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजरी बाजारात मिळत नाहीये. या कारणानेच बाजरी बाजारभावात वाढ झाली आहे.

सातारा जिल्ह्यात सोलर पॅनलवर चालणाऱ्या तब्बल 202 योजना मंजूर; शेतकऱ्यांना होणार फायदा

जळगावातील बाजारामध्ये राजस्थान सह नाशिक व राज्यातील इतर भागातून बाजरी येत असते. मात्र तिचे नुकसान झाल्याने सध्या भाव वाढले आहेत. याचबरोबर हिवाळ्यात बाजरीची मागणी ही वाढते.

मात्र, वाढलेली मागणी आणि कमी असलेला साठा लक्षात घेता ही भाववाढ झाली आहे. जळगाव बाजारपेठेमध्ये बाजरी 32 रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे या ठिकानातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 
पोस्टाच्या सेव्हिंग स्किममधील गुंतवणूकदारांसाठी खुशखबर; सरकार देणार दसऱ्याची मोठी भेट, होणार फायदाच फायदा
सावधान! ही लक्षणे जाणवल्यास समजा तुमच्या फुप्फुसात पाणी भरलंय; जाणून घ्या सविस्तर
शेतकऱ्यांनो जनावरांच्या आरोग्यात लोहाचा समावेश करा; उत्पादनात होईल वाढ

English Summary: Relief farmers price millet market increased Selling price
Published on: 04 October 2022, 03:05 IST