शासनाकडून कृषी यंत्रांवर विविध प्रकारचे अनुदान दिले जाते. त्यामुळे अनुदानित अवजारे राज्यभरात जर विचार केला तर कोट्यवधी रुपयांचे विकले जातात. परंतु नेमका कोणता विक्रेता अधिकृत आहे, हे समजणे खूप अवघड आहे. बरेचदा उत्पादकांकडून अवजारे घेतले जातात व शेतकऱ्याला विकल्याचे दाखवून पुन्हा तेच अवजार दुसऱ्या विक्रेत्या मार्फत विकण्याचे उद्योगही काही भागांमध्ये सुरू आहेत.
नक्की वाचा:Scheme: 'या' शेतकऱ्यांना मिळते विहीरीसाठी अनुदान,वाचा योजनेबद्दल महत्वाची माहिती
या सगळ्या समस्या वर उपाय म्हणून अशा अवजार उत्पादक आणि त्यांचे विक्रेत्यांची नोंदणी कृषी आयुक्तालय कडे जर करण्यात आली तर हा गोंधळ टाळता येईल अशी चर्चा कृषी विभागात असून त्यासंबंधीचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडून मंत्रालयात पाठवण्यात आला होता हो तो मान्य करण्यात आला आहे.
नक्की वाचा:Farmers Loan: सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी 1 कोटींचा निधी उपलब्ध
काय होईल याचा फायदा?
शेतकऱ्यांना जी काही अनुदानित अवजारे दिली जातात त्यासाठी 100 उत्पादकांची नोंदणी होण्याची शक्यता असल्याने यंत्र उत्पादकांच्या अखत्यारीत काम करणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांची संख्या मोठी असल्यामुळे जर त्यांची नोंदणी झाली तर उत्पादकानी नेमके कोणते अवजार उत्पादित केली व
त्याची बाजारामध्ये किती विक्री केली तसेच कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदानावर अवजारे देण्यात आली याची इत्थंभूत माहिती कृषी विभागाकडे संकलित होण्यास मदत होईल. त्यामुळे अवजारांवर जे काही अनुदान मिळते त्याचा गैरवापर होणार नाही.
Published on: 31 July 2022, 10:11 IST