News

नगर : जिल्ह्यात हमीदराने हरभरा खरेदी करण्यासाठी १२ ठिकाणी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. याशिवाय अजून कर्जत व कोपरगाव तालुक्यात साधारण तीन ते चार केंद्रे सुरु करण्याचे नियोजन आहे. १५ तारखेपासून विक्रीसाठी नोंदणी झाली सुरु झाली.

Updated on 24 February, 2021 4:00 PM IST

नगर : जिल्ह्यात हमीदराने हरभरा खरेदी करण्यासाठी १२ ठिकाणी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. याशिवाय अजून कर्जत व कोपरगाव तालुक्यात साधारण तीन ते चार केंद्रे सुरु करण्याचे नियोजन आहे. १५ तारखेपासून विक्रीसाठी नोंदणी झाली सुरु झाली. साधारण दीड महिना ही नोंदणी सुरु राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात यंदा ९५ हजार ८५५ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. पीकही चांगले आहे. त्यामुळे उत्पादनवाढीचा अंदाज आहे. १० ते १२ टन हरभऱ्याचे उत्पादन निघण्याचा अंदाज आहे. बाजारात आवक सुरू झाली की दर पाडले जात असल्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत हमीदराने खरेदी केली जाते.दरम्यान, जिल्ह्यात नगर व तालक्यातील साकत, श्रीगोंदा व तालुक्यातील मांडवगण, जामखेड, व तालुक्यातील खर्डा, पाथर्डी व तालुक्यातील तिसगाव, पारनेर व शेवगाव येथे नोंदणी सुरू आहे.

 

संगमनेरमधील केंद्राला जोडला अकोला

शेवगाव केंद्राला नेवासा तालुका जोडला आहे. राहुरी येथे नोंदणी सुरु आहे. त्या केंद्राला श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील शेतकरी जोडले आहेत. संगमनेर येथेही नोंदणी सुरू आहे. त्याला अकोले तालुका जोडला आहे. याशिवाय कर्जत, कोपरगाव तालुक्यात साधारण तीन ते चार ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी हनुमंत पवार यांनी सांगितले.

 

दरम्यान यंदाच्या हंगामात देशातील हरभरा  उत्पादनात घट  शक्यता असल्याचे इंफॉर्मिस्ट वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. हभरा उत्पादन ९६ लाख टनांच्या घरात राहणार असल्याचा अंदाज आहे.

English Summary: Registration for purchase of gram started at 12 places in Ahmednagar district
Published on: 20 February 2021, 11:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)