News

राज्यांनी एनपीके आणि द्रवरुप युरियाचा वापर वाढवून डीएपी खतांवरील अवलंबन कमी करावे, अशी सुचना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केली आहे. याशिवाय तोमर यांनी राज्यांना त्यांच्या खतांच्या आवश्यकतेबाबत पूर्वनियोजन करण्यास आणि केंद्र सरकारकडे खतांचा अंदाज कळविण्यास सांगितले आहे.

Updated on 28 January, 2022 3:19 PM IST

राज्यांनी एनपीके आणि द्रवरुप युरियाचा वापर वाढवून डीएपी खतांवरील अवलंबन कमी करावे, अशी सुचना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केली आहे. याशिवाय तोमर यांनी राज्यांना त्यांच्या खतांच्या आवश्यकतेबाबत पूर्वनियोजन करण्यास आणि केंद्र सरकारकडे खतांचा अंदाज कळविण्यास सांगितले आहे. ज्यामुळे खत विभागाला वेळेवर पुरेसा खत साठा देता येईल. 2021 -2 च्या उन्हाळी हंगामासाठी कृषीसंबंधी राष्ट्रीय परिषदेला गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोमर यांनी संबोधित केले.

यावेळी तोमर म्हणाले, उन्हाळी पिके केवळ अतिरिक्त उत्पन्न देत नाहीत, तर शेतकऱ्यांसाठी रब्बी आणि खरीप हंगामादरम्यान रोजगाराच्या संधीही निर्माण करुन उत्पादनही वाढवतात. कडधान्ये, भरड धान्ये, पोषक तृणधान्ये आणि तेलबिया यांसारख्या उन्हाळी पिकांच्य लागवडीसाठी सरकारने विविध कार्यक्रमांमद्वारे नवीन उपक्रम हाती घेतले आहेत.

हेही वाचा : कडाक्याच्या थंडीचा पिकांवर परिणाम; पिकांची अशी घ्या काळजी

उन्हाळी हंगामादरम्यान निम्याहून अधिक लागवड क्षेत्र कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्याखाली असले तरी सिंचनाच्या स्रोतांच्या मदतीने उन्हाळी हंगामात भात ामि भाजीपाला लावतात. भातासह उन्हाळी पिकांच्या लागवडीखाली क्षेत्र 2017-18 मधील 29.71 लाख हेक्टरवरुन 2.7 पटीने वाढून 2020-21 मध्ये 80.46 लाख हेक्टर झाल्याचे तोमर यांनी यावेळी सांगितले. मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मुल्यांकन करणे आणि राज्य सरकारशी सल्लामसलत करुन उन्हाळी हंगामासाठी पीकनिहाय लक्ष्य निश्चित करणे हा या परिषदेचा उद्देश होता.

 

पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण साम्रगीचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब सुलभ करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

English Summary: Reduce the use of DAP fertilizers, increase the use of NPK, liquid urea - Union Agriculture Minister
Published on: 28 January 2022, 03:19 IST