News

बदलत्या काळात शेतीमध्ये अनेक बदल होत आहेत. यामध्ये आता आधुनिक शेती केली जात आहे. नवनवीन प्रयोग करून चांगले पैसे कमवले जात आहेत. असे असताना आता लाल कोबीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

Updated on 01 March, 2022 10:15 AM IST

बदलत्या काळात शेतीमध्ये अनेक बदल होत आहेत. यामध्ये आता आधुनिक शेती केली जात आहे. नवनवीन प्रयोग करून चांगले पैसे कमवले जात आहेत. असे असताना आता लाल कोबीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. यामधून देखील चांगले मिळत आहेत. भारतात लाल कोबीची मागणी खूप वेगाने वाढत आहे. भाज्यांची आवड ही केवळ चवीवरुन नाही तर आरोग्याच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करुन होत आहे. यामुळे विचार करून आणि आरोग्याबाबत जागरूक असलेले नागरिक आता पोषक तत्वांनी समृद्ध फळ आणि भाज्या खातात.

हिरव्या पानकोबीची लागवड असते अगदी तशीच लागवड याची देखील आहे. लाल कोबीसाठी हलक्या प्रतीची आणि गुळगुळीत जमिन आवश्यक आहे. ज्या भागात 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आहे त्या भागात लाल कोबीचे उत्पादन अधिक मिळते. यापेक्षा जर तापमान अधिकचे असेल तर मात्र उत्पन्न कमी होऊ शकते. संकरीत वाणाची निवड केली तरच अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. तसेच सर्वच महिन्यात याला मागणी असल्याने दर देखील चांगला मिळतो.

लाल कोबीची लागवड करताना जमिनीची नांगरण करुन या जमिनीत हेक्टरी 10 ते 12 कुजलेले शेणखत टाकणे गरजेचे आहे. यानंतर हेक्टरी 60 किलो नायट्रोजन, 40 किलो फॉस्फरस आणि 40 किलो पोटॅश द्यावे. पानकोबीचे रोपण केल्यानंतर हलक्या पध्दतीने त्यास पाणी देणे गरजेचे आहे. जेणेकरुन जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाण अबाधित राहील. यामुळे सर्व प्रकारचे घटक मुळापर्यंत जातील. यामुळे कोबीची चांगली वाढ होईल.

पूर्ण वाढ झाल्यावरच कापणी करणे चांगले मानले जाते. लाल कोबीची लागवड ही हिरव्या पानकोबीप्रमाणेच आहे पण स्थानिक पातळीवर कृषी सहायकाचे मार्गदर्शन घेतले तर अधिकचा फायदा होणार आहे. शिवाय योग्य वाणाची निवडही करता येणार आहे. तसेच बाजारात न विकता इतर मोठ्या हॉटेलमध्ये देखील संपर्क केल्यास जास्त पैसे मिळणार आहेत. यामुळे ही शेती फायदेशीर ठरणार आहे.

English Summary: Red cabbage farming is profitable, learn economic math ...
Published on: 01 March 2022, 10:15 IST