पुणे :
राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात आणि नांदेड, हिंगोली, परभणी आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने आज (दि.२१) सातारा, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या भागात जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर दोन जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी केला आहे.
बहुतांशी भागांमध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस झाला. पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातही मध्यम स्वरुपाच्या सरी बहुतांशी भागात पडल्या.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले. नांदेड जिल्ह्यात रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरु होता.
Published on: 21 July 2023, 05:40 IST