News

राज्यातील दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागात (महाराष्ट्र डाक विभाग) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) या पदांसाठी २ हजार ४२८ उमेदवारांची भर्ती केली जाणार आहे.

Updated on 07 May, 2021 11:28 AM IST

राज्यातील दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागात (महाराष्ट्र डाक विभाग) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) या पदांसाठी २ हजार ४२८ उमेदवारांची भर्ती केली जाणार आहे.

या संदर्भातील जाहिरात इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी त्वरीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

पदे व जागा :
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
GDS-डाक सेवक.
काय आहे शैक्षणिक पात्रता :
१० वी उत्तीर्ण, मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट : १८ ते ४० वर्षे.
पदे : २४२८ जागा.

काय आहे परीक्षा शुल्क :
General/OBC/EWS: ₹ १००/ – [SC/ST/PWD/महिला: फी नाही. अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन. अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ मे २०२१.
अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiapost.gov.in/ वर लिंककरुन मिळवू शकतील.

English Summary: Recruitment will be done for 2428 posts in Maharashtra Postal Department, 10th pass candidates can apply
Published on: 04 May 2021, 06:38 IST