पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची सगळ्यात यशस्वी आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात येतात.
हे आपल्याला माहिती आहे. शासनाने या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही पात्रतेच्या अटी दिल्या आहेत. जसे की,डॉक्टर,वकील, चार्टर्ड अकाउंटंट, निवृत्तीवेतनधारक, आयकर दाते इत्यादीना या मधून वगळण्यात आले आहे. परंतु अशा पात्र नसलेल्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला आहे. शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचेकेंद्र सरकारने ठरवले असूनवसुली करण्यात येत आहे.
नक्की वाचा:सावधान! ही कारणे करू शकतात किडनी खराब, वाचा आणि करा स्वतःचा बचाव
परंतु खात्यातून परस्पर वसुली करता येत नाही कारण शेतकऱ्यांनी खात्यावर पैसे ठेवलेले नसल्यामुळे वसुलीत समस्या येत आहे. सरकारने वसुलीची जबाबदारी महसूल विभागावर सोपवली होती. परंतु कृषी विभाग आणि महसूल विभागातील मतभेदांमुळे ही वसुली मोहीम थंडावली होती. यावर उपाय म्हणून आता सोशल ऑडिट केले जाणार असून अशा अपात्र शेतकऱ्यांची यादी ही गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात येणार असून संबंधित शेतकऱ्यांचे संपूर्ण माहिती काढली जाणार आहे व वसुली केली जाणार आहे.
वसुलीचे काम आता जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहे. एवढेच नाही तर शासनाकडून गावागावात या योजनेच्या संबंधित शिबिरे आयोजित करून शेतकर्यांमध्ये जागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
महसूल आणि कृषी विभागाला साथ कृषी मित्राची
अशा पात्र शेतकऱ्यांचा शोध घेण्याचे काम आता गाव पातळीवर कृषी मित्र यांच्या माध्यमातून देखील घेतली जाणार आहे. गावागावात हे कृषी मित्र गावातील शेतकऱ्यांची माहिती संबंधित कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देणार आहेत. त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येऊन वसुलीला चालना मिळण्यास मदत होणार आहे व त्यासोबत या कृषी मित्रांच्या माध्यमातून योजनेसंबंधी माहिती देखील शेतकऱ्यांना होणार आहे.आता अकरावा हप्ताजन्मा होण्याअगोदर यामध्ये मोठे बदल करण्यात येणार असून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती साठी येथे 25 मार्च रोजी स्थानिक पातळीवर शिबिर आयोजित केले जाणार आहेत.
कृषी मित्र जी माहिती देतील त्या माहितीवर अवलंबून न राहता पुन्हा संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवकांकडून चौकशी केली जाणार आहे. कृषी मित्र व या संबंधित यंत्रणा ची माहिती बरोबर असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रे तहसीलदार कार्यालयात जमा करावी लागणार असून त्यावरून अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली आणि इतर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ या दोन्ही गोष्टी साध्य केल्या जाणार आहेत.(स्त्रोत-tv9मराठी)
Published on: 21 March 2022, 12:26 IST