News

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील जव्हार साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून महावितरणाच्या थकीत वीज बिलाची परस्पर वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Updated on 30 January, 2022 9:25 AM IST

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील जव्हार साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून महावितरणाच्या थकीत वीज बिलाची परस्पर वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अशी शेतकर्‍यांच्या ऊसबिलातून परस्पर थकित वीज बिलाची रक्कम वसूल करण्याचा प्रकार बेकायदेशीर असल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.याबद्दल सविस्तर माहिती अशी की, एका शेतकऱ्याच्या ऊस बिलाच्या  पावतीवर महावितरणची थकबाकी तीन हजार रुपये कारखान्याने ऊस बिलातून परस्पर वळती केल्याचे स्पष्टपणे छापून आले आहे. या घडलेल्या प्रकारानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.

 यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, जी वीज आम्ही  वापरत नाहीत त्यांचे बिल आलेले आहेत. यासाठी दोन वर्षापासून संघर्ष सुरू आहे. विज बिल मध्ये दुरुस्ती करून द्या आम्ही भरायला तयार आहोत असे आम्ही  वारंवार सांगितले आहे. ज्या ज्या वेळी वीज बिल मध्ये दुरुस्ती करून देण्यात आली, त्या त्या वेळी शेतकऱ्यांनी ती भरले आहेत. असे असताना सदोष वीज बिलाच्या रकमेपोटी साखर कारखान्यातून परस्पर रक्कम महावितरण वळती करण्याचा प्रकार सुरू आहे.

असे करणे बेकायदेशीर आहे व शेतकऱ्यांच्या संमती शिवाय त्यांच्या बिलातून कोणीही कोणतीही रक्कम वळती करू शकत नाही.हा कायद्याने गुन्हा असून याबाबतीत महावितरण कंपनी आणि संबंधित कारखान्याचे चेअरमन त्याच्यावर आर्थिक  गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत असे राजू शेट्टी म्हणाले.

English Summary: recover electrisity pending bill from cane bill of sugercane factory
Published on: 30 January 2022, 09:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)