News

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि आसपासच्या राज्यातील बरेचसे शेतकरी कोरोना संसर्गाची उद्रेकाच्या दरम्यानच जवळजवळ सहा ते सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत.

Updated on 25 May, 2021 10:09 AM IST

  केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि आसपासच्या राज्यातील बरेचसे शेतकरी कोरोना संसर्गाची उद्रेकाच्या दरम्यानच जवळजवळ सहा ते सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत.

तरीही पंजाबमधील शेतकरी आंदोलनस्थळी असतानाही पंजाबमध्ये जवळजवळ गव्हाचे विक्रमी उत्पादन होऊन 13 मे पर्यंत 132 लाख 16 हजार 187 मेट्रिक टन गव्हाच्या पिकाची मंडईत  विक्री झाली. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी मागील हंगामाच्या तुलनेत चौदाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त म्हणजेच 26 हजार कोटी रुपये कमावले.

 

असे असताना त्यांच्या पत्नी आणि घरातील इतर सदस्यांनी गव्हाच्या पेरण्या पूर्ण करून शेतात करावी लागणारी सगळी कामे वेळेत पूर्ण केली. विशेष म्हणजे या काळातच लॉकडाउन असल्याने बाहेरील राज्यातून येणारे सगळे मालगाड्या बंद होते. पंजाब मध्ये त्यावेळेस डीएपी आणि इतर खतांचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत होता तरीही त्यातून मार्ग काढत तेथील स्त्रियांनी हे काम करून दाखवले. यात सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे पंजाब सरकारने 10 एप्रिल ते 13 मे या 34 दिवसांमध्ये 130 लाख मेट्रिक टन गव्हाचे खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु त्यापेक्षा जास्त उत्पन्न 13 मे पर्यंत म्हणजेच 132 लाख 16 हजार 187 मेट्रिक टन गव्हाची विक्री झाली.

English Summary: Record production of wheat in Punjab despite farmers holding for six months
Published on: 25 May 2021, 10:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)