या खरीप हंगामात अतिवृष्टी अवकाळी पावसाने त्राहिमाम् माजवला होता, निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला होता. खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाला देखील अवकाळी व अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. खरीप हंगामातील सोयाबीन ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने सोयाबीनचे पीक पूर्णतः पाण्यात बुडाले होते. यामुळे सोयाबिनच्या उत्पादनात विक्रमी घट झाली आणि याचा परिणाम म्हणून सोयाबीनला समाधानकारक बाजार भाव प्राप्त झाला.
खरीप हंगामातील सोयाबीनला संपूर्ण हंगामभर विशेष मागणी होती, सुरुवातीला खरीप हंगामातील सोयाबीनला जवळपास दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला होता. मात्र मध्यंतरी केंद्र सरकारने सोया पेंड आयातीला परवानगी दिल्यामुळे सोयाबीनच्या बाजार भावात लक्षणीय कपात झाली. असे असले तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारपेठेचे गणित आत्मसात करून. जेव्हा सोयाबीन ला कमी बाजार भाव मिळत होता तेव्हा सोयाबीनची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला. परिणामी सोयाबीनची बाजारपेठेत कमतरता भासली आणि म्हणून सोयाबीनची मागणी वाढली आणि त्यामुळे साहजिकच बाजार भावात देखील वाढ झाली. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या या शहाणपणा मुळे संपूर्ण हंगाम भर सोयाबीनला समाधानकारक बाजार भाव प्राप्त झाल्याचे चित्र बघायला मिळाले होते. खरीप हंगामात मिळालेल्या बाजार भावामुळे गदगद झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात देखील चांगला बाजारभाव प्राप्त होईल या आशेने मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केलेली नजरेस पडत आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेतले जाते जिल्ह्यात विशेषता खरीप हंगामात सोयाबीनची लागवड नजरेस पडते मात्र यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
हाती आलेल्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील केवळ नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरला गेला आहे. सोयाबीन पेरणीच्या वेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पादन कसे मिळते याविषयी संभ्रमता कायम होती मात्र आता जिल्ह्यातील सोयाबीन जोमात बहरत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात सोयाबीनला चांगली फळधारणा झाली आहे. आता सोयाबीनचे पीक शेगांनी चांगलेच लढून गेले आहे. गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यासमवेतच संपूर्ण राज्यात सोयाबीनच्या बियाण्याला सोन्यासारखा भाव प्राप्त झाला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करून पेरणी करणे परवडत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. शिवाय बाजारातून खरेदी केलेले बियाणे अनेकदा निकृष्ट दर्जाचे निघून जातात त्यामुळे पेरणी केलेला सोयाबीन कधी कधी तर अंकुरत देखील नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी केवळ बियाण्यासाठी सोयाबीनची लागवड केली आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, उन्हाळी सोयाबीन हा पावसाळी सोयाबीन पेक्षा अधिक दर्जेदार, दाणेदार आणि परिपक्व असतो त्यामुळे उन्हाळी सोयाबीन बियाण्यासाठी सर्वोत्कृष्ट समजला जातो. म्हणून जिल्ह्यातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ बियाणे निर्मितीच्या अनुषंगाने सोयाबीनची लागवड केल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याशिवाय उन्हाळी सोयाबीनला खरिपातील सोयाबीन प्रमाणे समाधान कारक बाजार भाव मिळेल या आशेने नांदेड जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे.
Published on: 30 January 2022, 09:21 IST