News

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे, यामुळे देशातील उद्योगधंदे बंद आहेत. यामुळे देशातील अर्थव्यवस्था डबघाईला येऊ लागली होती. अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि राज्यांना महसूल मिळावा यासाठी दारूची दुकाने उघडण्यात आली.

Updated on 05 May, 2020 6:09 PM IST

 

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे, यामुळे देशातील उद्योगधंदे बंद आहेत. यामुळे देशातील अर्थव्यवस्था डबघाईला येऊ लागली होती. अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि राज्यांना महसूल मिळावा यासाठी दारूची दुकाने उघडण्यात आली. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवारी दारूची दुकाने उघडण्यात आली. काल सकाळपासूनच लोक दारुच्या दुकानाबाहेर जमायला लागले. पहिल्याच दिवशी पाच राज्यात पाच कोटी रुपयांची दारू विकली गेली. दारूविषयी लोकांमध्ये खूप उत्साह होता हे यावरुन दिसून येते.

दरम्यान याा लॉकडाऊनच्या काळात काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली. दारुच्या दुकानांसह इतर काही दुकानेही उघडण्यास परवानगी यावेळी देण्यात आली. एकूण ७३६ जिल्ह्यांपैकी ६०० जिल्ह्यात दुकाने उघडली. तथापि, सर्वाधिक गर्दी दारूच्या दुकानांवर होती. काही शहरांमध्ये दोन किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या. उत्तर प्रदेशात २२५ कोटी, महाराष्ट्रात २०० कोटी, राजस्थानमधील ५९ कोटी, कर्नाटकमध्ये ४५ कोटी आणि छत्तीसगडमध्ये २५ कोटी रुपयांची दारुची विक्री झाली. दरम्यान दिल्लीत दारूच्या किंमतीत ७० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने ‘स्पेशल कोरोना फी’ अंतर्गत हा कर वाढवला आहे.

दिल्लीत दारूच्या किंमतीत ७० टक्क्यांनी वाढ

दिल्ली सरकारने सोमवारी रात्री मोठा निर्णय घेत दारूच्या किंमतीत ७० टक्क्यांनी वाढ केली आहे. मंगळवारपासून म्हणजेच आजपासून वाढीव दर लागू होतील. दिल्ली सरकारने एमआरपीवर ७० टक्के कर जाहीर केला आहे. दिल्लीत दारुची दुकानं सकाळी ९ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत खुले राहतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना कायद्याचं अनुसरण करण्याचं आवाहन केलं आहे जेणेकरुन दिल्लीत औद्योगिक व्यवसाय हळूहळू उघडता येतील. ते म्हणाले की जर लोकांनी नियमांचे पालन केलं नाही तर सूट मागे घेतली जाईल.

English Summary: record in five state; 554 crore rupees alcohol sold in on day
Published on: 05 May 2020, 06:04 IST