News

पंतप्रधान किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळ जवळ 12.14 कोटी शेतकऱ्यांना फायदा मिळाला आहे. केंद्र सरकारने या योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे.

Updated on 05 September, 2021 10:39 AM IST

 पंतप्रधान किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे.  या योजनेच्या माध्यमातून जवळ जवळ 12.14 कोटी शेतकऱ्यांना फायदा मिळाला आहे. केंद्र सरकारने या योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा  केला आहे.

 ऑगस्ट- नोव्हेंबर 2021चा 2000 चा हप्ता10 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे. परंतु पी एम किसान पोर्टल वर 30 ऑगस्टपर्यंत दिलेल्या माहितीच्या आधारे जवळ जवळ दोन कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता येऊ शकलेला नाही.

 पी एम किसान पोर्टल वर 2.68 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा पेमेंट थांबवले गेले आहे. या प्रक्रियेमध्ये जवळ-जवळ 31 लाख शेतकऱ्यांचे अर्जPFMS कडून पहिल्या पायरीला रिजेक्ट  केले गेले आहे. तसेच बऱ्याच अपात्र शेतकऱ्यांच्या विरोधात सरकारने कडकपावले उचलली आहेत.

 त्यामुळे पी एम किसान योजनेच्या लाभधारक यादी मधुन अपात्र शेतकर्‍यांना हटवले गेले आहे.

 पी एम किसान योजनेचा हप्ता थांबण्याचे काही कारणे

जर पी एम किसान योजनेच्या माध्यमातून येणार हप्ता थांबला असेल तर त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे आधार कार्ड वरील नाव आणि बँक खाते नाव यामध्ये काही बदल असणे तसेच आधार ऑथेटीकेशनफेल होणे  अशी कारणे असू शकतात. तसेच बर्‍याच अपात्र शेतकऱ्यांचा हप्ता ही सरकारने थांबविला आहे.

 तुमचा हप्ता थांबण्या मागची कारणे कशी चेक करावीत?

  • यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला https://pmkisan.gov.inपोर्टलवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला पेमेंट सक्सेस टॅबच्याखाली भारताचा नकाशा दिसेल.
  • त्याखाली डॅशबोर्ड असं लिहिलेलं असेल, त्याचे क्लिक करावे.

 

  • तेथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होते.
  • हे ओपन झालेले पेज व्हिलेज डॅश बोर्डचेअसते.या पेजवर तुम्हाला तुमच्या गावाची पूर्ण तपशीलवार माहिती मिळेल.
  • सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचे स्टेट सिलेक्ट करावे त्यानंतर तुमचा जिल्हा नंतर तालुका आणि गाव सिलेक्ट करावे.
  • त्यानंतर शो बटनावर क्लिक करावे. नंतर तुम्हाला ज्या बद्दल माहिती घ्यायची आहे त्याबटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्यासोबत पूर्ण डिटेल येते.
  • व्हिलेज डॅशबोर्ड च्या खाली  तुम्हाला चार बटन दिसतात. जर तुम्हाला ही माहिती घ्यायची  असेल की शेतकऱ्यांचा डेटा पोहोचला आहे की नाही तर डाटा रिसीव्ह या बटणावर क्लिक करावे. यांचा हप्ता पेंडिंग आहे त्यांनी दुसऱ्या बटनावर क्लिक करावे.

 

English Summary: reason behind pm kisaan yojna benifit stop
Published on: 05 September 2021, 10:39 IST