आज पर्यंत देशांमध्ये सर्वाधिक हळद लागवडीचे नोंदी तेलंगणा राज्याच्या नावावर होती. जर आपण इतर पिकांच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक पिकाचे सरासरी क्षेत्र ठरलेले असते त्यानुसार त्याची उत्पादकता आणि किती क्षेत्रात लागवड केली आहे हे ठरवले जाते
परंतु हळदीचे सरासरी क्षेत्र ठरवतांना ढोबळमानाने ठरवले जात होते. यावर्षी कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार बांधावर जाऊन हळद लागवडीचे नोंद घेण्यात आले तेव्हा वेगळीच सत्यता समोर आली. देशात तेलंगाना नाहीतर महाराष्ट्र हळद लागवडीत अव्वलस्थानी असल्याचे समोर आले आहे.
यावर्षी हळद दराची स्थिती
यावर्षी झालेला पाऊस तसेच हळद लागवड क्षेत्रामध्ये तुंबलेले पाणी तसेच अगदी अंतिम टप्प्यामध्ये करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळदीच्या एकूण उत्पादकतेमध्ये घट झाली आहे. त्यामुळे हळदीचे भाव हे दहा हजाराच्या कडे वाटचाल करत आहेत. जर आपण महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा या जिल्ह्याचा विचार केला तर या भागातील हळदी फेब्रुवारीपर्यंत काढणीस येते तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली या भागातही मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते.
हळदीचे वेगळे वैशिष्ट्य नुसार हळदीचे दर ठरवले जातात. यावर्षी उत्पादकतेत घट आल्याने दरात तेजी राहणार आहे.
जर महाराष्ट्र राज्यात हळद लागवड क्षेत्राचा विचार केला तर हिंगोली जिल्हा अव्वल स्थानी आहे. हिंगोली बाजारपेठेतून शेजारील गुजरात आणि कर्नाटक याठिकाणी हळदीची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. महाराष्ट्रातील एकूण 84 हजार लागवड क्षेत्रापैकी एकटा हिंगोली जिल्ह्यात 49 हजार हेक्टर आधी ची लागवड केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यात शेतजमीन आणि ची योग्य व्यवस्थापन मुळे उत्पादकताहीमोठ्या प्रमाणात आहे.
हळद लागवडी मध्ये आता मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा अवलंब होत असल्यामुळे हळद उत्पादकता वाढली आहे. अगोदर हळद लागवड ही वरंब्यावर केली जात होती. परंतु आता हळद उत्पादनामध्ये ठिबक सिंचन तसेच फर्टिगेशन तसेचलागवड करताना ती गादीवाफ्यावर केली जाते अशा पद्धतींचा अवलंब केल्यामुळे हळद उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे.तसेच अधिक दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल ही हळद लागवडीकडे वाढताना दिसत आहे.(संदर्भ-tv9 मराठी)
Published on: 06 January 2022, 08:55 IST