सध्या आपण जर सोयाबीन दराचा विचार केला तर 4700 प्रतिक्विंटल ते 5200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहे. सध्या सोयाबीनचे काढण्याचे काम सुरू असून नवीन सोयाबीन बाजारपेठेत येऊ लागले आहे. तसेच काही ठिकाणी सोयाबीन काढणीच्या वेळेस पावसात ओले झाल्यामुळे त्याचे कारण देत देखील कमी भावाने सोयाबीन खरेदी केली जात आहे. या लेखामध्ये आपण आजचे काही निवडक बाजार समिती मधील सोयाबीनच्या भावाची माहिती घेऊ.
सोयाबीनचे आजचे बाजार भाव
1- यवतमाळ बाजार समिती- जर आपण आजच्या यवतमाळ बाजार समितीत 456 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. त्यामध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला कमीत कमी 4500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जास्तीत जास्त दर हा 4855 प्रति क्विंटल इतका मिळाला. जर आपण आजच्या झालेल्या लिलावाचा विचार केला तर सरासरी दर हा यवतमाळ बाजार समितीत 4 हजार 697 रुपये होता.
2- वाशिम बाजार समिती- जर आपण आजच्या वाशिम बाजार समितीत झालेल्या लिलावाचा विचार केला तर तीन हजार 600 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन झालेल्या लिलावात कमीत कमी सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त पाच हजार 273 रुपये इतका दर मिळाला. भावाचे सरासरी पाच हजार इतकी राहिली.
3- परतूर बाजार समिती- परतूर बाजार समितीमध्ये आज 40 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन झालेल्या लिलावात 3581 रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त 4300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सोयाबीन दराची सरासरी चार हजार चाळीस रुपये इतकी राहिली.
नक्की वाचा:बंगालच्या उपसागरात 'सीतरंग' चक्रीवादळाची शक्यता, यामुळेच महाराष्ट्रात तुफान पाऊस..
4- अकोला- अकोला बाजार समितीमध्ये आज दोन हजार पाचशे सात क्विंटल सोयाबीनचे आवक होऊन झालेल्या लिलावात कमीत कमी तीन हजार 250 रुपये प्रतिक्विंटल आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. भावाची सरासरी चार हजार 250 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
5- हिंगोली- हिंगोली बाजार समितीत आज 901 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन झालेल्या लिलावात सोयाबीनला कमीत कमी चार हजार 499 रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार 40 रुपये दर मिळाला. सरासरी ही 4769 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
6- बीड- बीड बाजार समितीमध्ये आज 206 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन झालेल्या लिलावात सोयाबीनला 3856 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर सोयाबीन बाजार भावाचे सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटल इतके राहिली.
Published on: 18 October 2022, 04:24 IST