मोदी सरकारने नवा फतवा काढलाय देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना हर घर तिरंगा हे अभियान राबवल्या जावे. (हर घर.....या २०१४ च्या घोषणेनेनेच देश रसातळाला गेलाय.)खरं तर स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी देशवासीयांच्या मनात राष्ट्रध्वजाचा अभिमान असतोच ऐरवी तो ईतर दिवशी म्हणजे वर्षाचे ३६५
दिवस सुध्दा असतोच. तिरंगा हे देशाच्या स्वातंत्र्याचे व अस्मीतेचे प्रतीक.Tricolor is a symbol of freedom and identity of the country.तिरंग्याची आन बान शान आबाधीत राहो यासाठी कित्येक जण हसत हसत कुर्बान झालेत कित्येक शहीद झालेत. पुलवामा स्फोटात कित्येक सैनीक तिरंग्यात लपेटुन आलेत. मात्र अजुनही त्या स्फोटाचा व स्फोटकाचा शोध लागला नाही. कारण ?
आमचे सैनिक सिमेवर तिरंग्याच्या रक्षणार्थ डोळ्यात तेल घालुन सज्ज आहेत.आज घराघरात तिरंगा लावावा हा आदेश का ? स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी आोलांडतांना तिरंगा ही जबरदस्ती करावी म्हणजे आमचे देशप्रेम कमी झाले की काय असा स्वत:वर संशय यायला लागला. आम्ही बेगडी देशप्रेम दाखवणारे नाही. आमचे देशप्रेम देखावा नाही ते अंतरंगातुन आहे. मात्र खुलेआम संविधान नाकारणारे तिरंग्याचे अस्तीत्व
नाकारणारे आज देशप्रेम दाखवत आहेत त्यांच्या या दुटप्पी वागण्यावर संशय मात्र येतोच.संघप्रणीत भाजप सरकार आज देशात शासन व्यवस्था सांभाळत आहे. याच संघाने ५२ वर्ष त्यांच्या मुख्यालयी कधीच राष्ट्रध्वज फडकवला नव्हता. कारण संघी तिरंग्यास राष्ट्रध्वज मानतच नव्हते. हा मुद्दा २००० मधे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेत उपस्थीत केला. यावर बरीच वादळी चर्चा
झाली. बाळासाहेबांच्या भाषणात भाजपच्या मंडळींनी बरेच अडथडे आणले मात्र आपला मुद्दा बाळासाहेबांनी जोरकस पणे मांडला. स्वातंत्र्यानंतर केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात यांच्यात एक करार झाला होता त्यानुसार संघावरील बंदी हटवली कैद्यांची मुक्तता केली व संघाने राष्ट्रध्वज त्यांच्या कार्यालयावर फडकवावा असे ठरले होते मात्र संघाने तिरंग्याला
कधीच सन्मान दिला नाही हाच खरा ईतिहास आहे. जर आज प्रत्येक घरावर तिरंगा लावावा हेच खरे देशप्रेम असेल तर मग संघाने ५२ वर्ष तिरंगा फडकवलाच नाही तर ते देशद्रोही होते असेच समजावे लागेल.आज देशप्रेमाचे गोडवे गाणारांचा कटु ईतिहास सुध्दा आहे. खरा ईतिहास खोडुन त्याचा नवा अवतार सांगणारे आज आम्हाला देशप्रेम शिकवायला निघालेत. भाजपचे नेते संघ आमचा आत्मा आहे असे
सांगतात मात्र जो संघ तिरंग्याचा सन्मान करत नाही त्या संघाबद्दल व पक्षाबद्दल आमची म्हणजे जनतेची भुमिका काय असावी ? हा विचार करणे व संघाची छुपी भुमिका समजुन घेणे आज गरजेचे आहे. सोईपोटी तिरंगा व गांधी याचा स्विकार म्हणजे देशप्रेम ठरेल काय ? खाण्याचे व दाखवण्याचे दात वेगवेगळे असतील तर विश्वास कसा राहील.संघाचा टोकाचा राष्ट्रवादी विचार स्वांतंत्र्यानंतर ही
वेगळ्या भुमिकेत होता. संविधान व राष्ट्रध्वज त्यांना मान्य नव्हते. आज ज्या लोकशाहीत ते सत्ता उपभोगत आहेत ते पाहता त्यांच्या मुळ विचारांशी त्यांनी फारकत घेतली आहे असे नाही तर संविधानाच्या चौकटीत राहत असल्याचे भासवुन संविधान संपवण्याची नवी व्यव्यस्था ते अंगीकारत आहेत.बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या भुमिकेने देशपातळीवर संघाचा खरा चेहरा स्पष्ट झाला , तेव्हा
काही कार्यकर्त्यांनी संघाच्या मुख्यालयात घुसुन तिरंगा लावण्याचा प्रयत्न केला मात्र तो संघाने यशस्वी होवु दिला नाही. जेव्हा हे सत्य वा-याच्या वेगाने पसरत गेले तेव्हा २००२ साली संघाने मुळ भुमिकेला मुरळ घालत त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यास सुरवात केली मात्र ते देशप्रेम म्हणुन नव्हे तर धाक म्हणुन. संघाच्या मुख्यालयात दस-याला शस्त्रास्त्रांची पुजा व्हायची मात्र वंचित बहुजन
आघाडीचे सुप्रीमो बाळासाहेब आंबेडकरांनी त्या शस्त्रांच्या परवान्याची चौकशी करावी अशी विचारणा करताच संघाने ती पुजा थांबवली हे विशेष.देशप्रेम अंतरंगातुन असावे देश स्वातंत्र्यप्राप्तीत ज्यांचे कवडीचेही योगदान नव्हते त्यांना देशप्रेमाची अनुभुती काय असेल. आम्हाला तिरंग्याचा काल अभिमान होता , आजही आहे आणी भविष्यातही असेल. देशप्रेम तुम्ही शिकवु नये.
Durgasing solanake
jilla upadhyaksh
Rashtrawadi Congress party
Granthalaya vibhag Buldhana
Published on: 09 August 2022, 06:10 IST