भारतात गेल्या दशकापासून शेती क्षेत्रात मोठा बदल बघायला मिळत आहे. आता शेतकरी बांधव पारंपरिक पिकाला फाटा देत नगदी पिकांची लागवड करीत आहेत. शेतकरी बांधव आता पीक पद्धतीत मोठा बदल करीत चांगले उत्पन्न प्राप्त करीत आहेत.
आज आपण काजू शेती विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. काजू लागवड शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने बक्कळ नफा कमवून देऊ शकते याविषयी आज आपण माहिती घेऊया. जगातील एकूण काजूच्या उत्पादनात आपल्या भारताचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
हाती आलेल्या एका आकडेवारीनुसार, काजूच्या एकूण जागतिक उत्पादनात आपल्या देशाचा 25 टक्के हिस्सा आहे. आपल्या देशात केरळ, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये काजुची लागवड केली जाते. मात्र, आता झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील याची लागवड केली जात आहे.
हेही वाचा:-शेतकऱ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग! स्ट्रॉबेरीचे घेतले यशस्वी उत्पादन; लाखो रुपये उत्पन्नाची आशा
काजूचे रोप उष्ण तापमानात आणि दमट हवामानात चांगले वाढते. याच्या लागवडीसाठी योग्य, तापमान 20 ते 35 अंशांच्या दरम्यान असावे असे कृषी वैज्ञानिकांचे मत आहे. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे, याची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत केली जाऊ शकते. असे असले तरीही, लाल वालुकामय चिकणमाती असलेली जमीन यासाठी सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते. काजूची रोपे कलम पद्धतीने तयार करता येतात. याशिवाय झाडे कटिंग पद्धतीने तयार करता येतात.
काजूच्या पिकात आंतरपीक देखील घेतले जाऊ शकते. आंतरपीक घेऊन शेतकरी या पिकाच्या लागवडीतून जादा कमाई करू शकतात. भुईमूग, मसूर किंवा शेंगा किंवा बार्ली-बाजरी सारखी आंतरपिके काजु मध्ये घ्यावीत असा सल्ला वैज्ञानिक देत असतात. यामुळे शेतकरी केवळ काजू पिकातूनच नाहीतर, तर इतर आंतरपिकांमधूनही चांगला नफा कमवू शकतील.
हेही वाचा:-'या' औषधी वनस्पतीची लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा; वाचा याविषयी
कृषी तज्ज्ञांच्या मते, काजूच्या एका झाडापासून 10 किलोपर्यंतचे उत्पादन आरामात घेता येऊ शकते. एक किलो काजु उत्पादन 1200 रुपयांना विकले जाते, म्हणजेच फक्त एका रोपातून तुम्ही 12000 हजारांचा नफा सहज कमवू शकतात. यामुळे, अधिक संख्येने काजुची रोपे लावल्यास, आपण लखपती बनू शकता.
हेही वाचा:-कृषी विभागाचा शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सल्ला! खरीप हंगामापूर्वी 'हे' काम करा; नाहीतर होणार नुकसान
Published on: 29 March 2022, 12:57 IST