पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाबार्डच्या ५ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. रिझर्व्ह बँकेने आज तशी घोषणा केली.
कोविद १९ मुळे देशाच्या अर्थव्यस्थेला धक्का बसला आहे. ताळेबंदीमुळे संपूर्ण देशात आर्थिक व्यवहाराला मरगळ आली आहे, यामुळे ग्रामीण भागाला चालना मिळण्यासाठी केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला आहे.
नाबार्डला देण्यात येणार पैसा हा बिगर बँकिंग क्षेत्रातील कंपन्या आणि,छोट्या संस्था यांना कर्जाच्या स्वरूपात पैसे उपलब्ध व्हावा यासाठी देण्यात येणार आहे. हे पैसे कर्जाच्या रूपात देण्यात आहे.याचबरोबर बँकेने नॅशनल हौसिंग बँकेला ५ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे.
Published on: 07 August 2020, 01:11 IST