अन्नद्रव्य अभावामुळे पिकाची जोमाने वाढ होत नाही परिणामी उत्पन्न कमी येते.पिकाची वाढ खुंटते आणि नवीन येणारी पाने मरु लागतात.यावर उपाय म्हणून योग्य त्या वेळी कृती केलेली बरी.अन्नद्रव्य अभावामुळे पिकावर विविध तर्हेचे लक्षणे दिसून येतात जसे पालाश च्या कमतरतेमुळे पानांच्या कडा
तांबडसर पडतात आणि नत्राचे जर प्रमाण अतिशय कमी असेल तर संपूर्ण झाडांची पाने खालून पासून वरती पर्यंत पिवळी होतात .गधक ची कमतरता असलेल्या जमिनीत नवीन येणारी पाने पालवी पिवळी पडू लागतात.In Gadhak deficient soil the newly emerging leaves start to turn yellow.या अशा गंभीर परिस्थिती वर उपाययोजना म्हणून पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय अकोला, अंतिम वर्षाचे विदयार्थी हर्षवर्धन रोठे, आकाश
सिरसाट,प्रतीक मोहोकार यांनी RAWE &AIA कार्यक्रमाअंतर्गत पिकातील अन्नद्रव्य अभावाचा चार्ट बनून सिसा उदेगाव येथे विविध लक्षणांची माहिती शेतकऱ्यानं सादर केली.शेतातील लक्षण दिसणाऱ्या पिकाच्या पानांना शेतकऱ्यांना दाखवून त्यावरी असणाऱ्या कमतरतेची शेतकरी वर्गाला जाणीव करून दिली .यावेळी पालाश मुळे होणाऱ्या लक्षणांवर उपाय म्हणून
पालशायुक्त रासायनिक खते देण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच रासायनिक खते ,द्रावण फवारणी, गंधक पुरवणी विषयी योग्य ती माहिती दिली आणि उपाय योजना सांगितल्या.या दरम्यान शेतकरी वर्ग मंगेश मोतीराम दहातोंडे ,विठ्ठल बोळे , संतोष दहातोंडे,संदीप दहातोंडे आणि ज्ञानेश्वर दहातोंडे उपस्थित होते.संतोष दहातोंडे यांच्या शेतात हा उपक्रम पार पाडण्यात आला.
यापूर्ण सादरीकरणामध्ये कृषि महाविद्यालय, अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. माने सर, माती विज्ञान शाखा प्रमुख डॉ प्रकाश गीते सर तसेच कृषि विज्ञान केंद्र,अकोलाचे प्रमुख डॉ. ठाकरे सर, श्री. तुपकर सर व कार्यक्रम अधिकारी श्री. संजय कोकाटे, डॉ. अतुल वराडे व डॉ. निलम कणसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Published on: 31 July 2022, 09:21 IST