News

राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादन शेतकरी पाऊस आणि पिकांवर पडलेल्या रोगांमुळे मोठा आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पादन घटणार आहे, खर्च दुप्पट तर उत्पादन अत्यल्प, तसेच भाव सुद्धा मिळणार नाही. यामुळे आज शेतकरी अडचणीतच नाही तर आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे.

Updated on 09 October, 2023 10:50 AM IST

राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादन शेतकरी पाऊस आणि पिकांवर पडलेल्या रोगांमुळे मोठा आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पादन घटणार आहे, खर्च दुप्पट तर उत्पादन अत्यल्प, तसेच भाव सुद्धा मिळणार नाही. यामुळे आज शेतकरी अडचणीतच नाही तर आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांना काही घेणे देणे नाही. अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीन उत्पादन करणारे शेतकरी आहेत. सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सुमारे 60 ते 70 टक्के पीक वाया जाण्याची परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे सोयाबीनला पिकाला योग्य भाव मिळत नसुन सोयाबीनचे भाव पडलेले आहेत.

ज्याप्रमाणे महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या, त्याचप्रमाणं संपूर्ण महाराष्ट्रात आगामी काळात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय.

English Summary: Ravikant Tupkar warns that the sons of farmers will not stop the cars of ministers
Published on: 09 October 2023, 10:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)