बुलढाणा - जिल्ह्यात अतिवृष्टि झाल्यामुळे शेतकर्याचे मोठे नुकसान सोयाबीनसह इतर पिकाचे झाले होते.शासनाकडुन नुकसाग्रस्तांना 75%नुकसान भरपाई अदा करण्यात आली असे असतांना देखील पिकाचा विमा काढलेल्यांना यावर्षीची विमा रक्कम मिळाली नसल्याने आज चिखली तालुक्यातील सवणा व इतर गावातील शेतकर्यानी स्वाभिमानी चे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात विमा कंपनीच्या प्रतिनीधीस कार्यालयातच डांबुन ठेवत आक्रमक पावित्रा घेतल्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना विमा धारकांच्या खात्यावर 10दिवसाच्या आत रक्कम जमा करण्याचे अश्वासन देण्यात आल्याने रात्री उशीरा आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.
रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमा काढला होता,पैनगंगा नदिकाठच्या शेतकर्याच्या जमीनी पिकासह खरडुन गेल्या आहेत.एकीकडे शासनाने नुकसान ग्रस्तांना थोड्या प्रमाणात नुकसान भरपाई मदत दिली आहे.मात्र रिलायन्स विमा कंपनी ने बुलडाणा जिल्ह्यातील अनेक नुकसाग्रस्त शेतकऱ्यांची नावे या विमा यादी मधून वगळल्याने शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्याय केला आहे, त्यामुळे चिखली मंडळातील सवणा व इतर गावातील अनेक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व चिखली तालुक्याचे स्वाभिमानी चे नेते विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन करत कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये रिलायन्स कंपनीचे जिल्हा मुख्य समन्वयक शर्मन कोडियात्तर यांना कार्यालयात डांबून ठेवले,आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्यांची सुटका करणार नाही असा पवित्रा रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांनी घेतला होता,
मात्र बऱ्याच वेळानंतर जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांनी मध्यस्थी करत त्यांनी कृषी आयुक्तांशी संपर्क साधला आणि श्रमण कोडिया यांनी देखील आपल्या रिलायन्स कंपनीच्या वरिष्ठांशी बोलून आंदोलक शेतकऱ्यांना दहा दिवसात पीक विमा जमा करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी या सर्व अधिकाऱ्यांची कार्यालयातून सुटका केली,मात्र येत्या दहा दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा करण्यात आला नाही तर मात्र थेट रिलायन्स कंपनीचे मालक अंबानी यांच्या घरावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला आहे.यावेळी स्वाभिमानी चे डॉ ज्ञानेश्वर टाले,विनायक सरनाईक,अमोल मोरे,दत्ता जेऊघाले,सतिष सुरडकर,शिवाजी देव्हडे,राहुल पवार,नितिन शेळके,नारायण भुसारी,विठ्ठल भुतेकर,पंजाब हाडे,शे जफ्फर शे इस्माइल,उमेश करवंदे,किशोर हाडे,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते
शेतकर्याचाही आंदोलन छेडण्याचा इशारा.
72तासात नुकसानीचा अर्ज घेता तर नुकसानीची मदत अजुन का नाही असे म्हणत पैनगंगा नदिकाठच्या नुकसाग्रस्त शेतकर्याना तातडीने पिक विमा रक्कम अदा करावी अशी मागणी रविकांत तुपकर,विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात चिखली सवणा येथील शेतकरी यांनी केली आहे.लेखी अश्वासनाची पुर्तता न झाल्यास स्वाभिमानी स्टाइलने आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा पैनगंगा नदिकाठावरील शेतकर्यानी निवेदनाव्दारे दिला आहे.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 01 December 2021, 07:43 IST