News

रेशनकार्ड हे आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. अनेकदा ते सरकारी कामासाठी देखील मागितले जाते. तसेच त्यावर अनेकांना धान्य मिळते. असे असताना यामध्ये अनेक बदल होत गेले आहेत. रेशन कार्ड (Ration Card) अर्थात शिधापत्रिका हा महत्त्वाचा दस्तावेज (Document) मानला जातो.

Updated on 22 May, 2022 9:48 AM IST

रेशनकार्ड हे आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. अनेकदा ते सरकारी कामासाठी देखील मागितले जाते. तसेच त्यावर अनेकांना धान्य मिळते. असे असताना यामध्ये अनेक बदल होत गेले आहेत. रेशन कार्ड (Ration Card) अर्थात शिधापत्रिका हा महत्त्वाचा दस्तावेज (Document) मानला जातो.

यामध्ये मात्र काही वर्षांपासून लाखो अपात्र नागरिक बनावट पद्धतीने तयार केलेल्या रेशन कार्डच्या माध्यमातून शासकीय रेशन योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सरकारने यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.

देशात लाखो अपात्र नागरिक बनावट रेशन कार्ड तयार करून घेऊन रेशन योजनेचा लाभ घेत आहेत. यामुळे आता या लोकांचे रेशन थांबवण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील (National Food Security Act) काही नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बचत गटातील महिलांनी करून दाखवले! शेतकरी महिला गटाचा तांदूळ, आंबा महोत्सवास मोठा प्रतिसाद

यामुळे आता अपात्र नागरिकांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. आता उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, उत्तराखंड सरकारने त्यांच्या रेशन कार्ड तपासणीचे आदेश दिले आहेत. तसेच रेशन योजनेसाठी पात्र नसलेल्या सर्व रेशन कार्डांची तपासणी करून ते रद्द करण्याचे देखील आदेश दिले आहेत. अनेकांनी गेल्या काही वर्षात बनावट रेशन कार्ड बनवली होती.

बिहारमध्ये जे नागरिक शासकीय विभागांमध्ये कॉन्ट्रॅक्टवर कार्यरत आहेत त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत. तसेच ज्या नागरिकांकडे चारचाकी वाहने, शस्त्र परवाना आहे, घरात एसी आहे, तसेच जे सरकारी नोकरी करतात, घरातील एखादी व्यक्ती कर भरते, ज्यांच्याकडे अडीच एकरापेक्षा अधिक जमीन आहे. त्यांचे देखील कार्ड रद्द होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:
लिलावाविना फळे बाजार समितीमध्येच पडून, खरेदीला गेलं की ५० ला एक, कसा घालायचा मेळ
कारखाना आणि उसाच्या शेतातील अंतराने घेतला शेतकऱ्याचा बळी, अंतर होते फक्त २५ किलोमीटर, कारखान्यावर कारवाई करा
7th pay commission: मोठी बातमी! 5 दिवसांत हे काम करा अन्यथा पेन्शन रखडणार, सरकारचा इशारा..

English Summary: Ration cards of 'those' people will be canceled !! announcement government, read the new rules
Published on: 22 May 2022, 09:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)