सध्याच्या परिस्थितीत जागतिक बाजारात सोयाबीनचे दर वाढ झालेली पाहायला मिळत आहे.शेतमालाच्या दरात झालेल्या वाढीसाठी व्यापारातील गुंतवणूकदार जबाबदार नसून मागणी आणि पुरवठ्यातील मूलभूत घटकांमधील असंतुलन जबाबदार आहे असे जिनिव्हा येथे झालेल्या ग्लोबल प्रेस कॉन्फरन्समध्ये कृषी उद्योगातील जाणकारांनी सांगितले.
या कॉन्फरन्समध्ये बोलताना युक्रेनच्या कृषी विभागाचे उपमंत्री तारस कचका म्हणाले की, यावर्षी शेतीमाला मध्ये झालेली वाढ ही अनेक वर्षांतील उच्चांक वाढ आहे.या वाडी ची स्थिती म्हणजे बाजारातील नवीन स्केल म्हणता येईल परंतु मका, सोयाबीन आणि गहू दरातील ही वाढ शाश्वत नाही. जर आपण कोरोना काळाचा विचार केला तर या काळामध्ये शेतीमालाची मागणी वाढली आणि लॉजिस्टिक सुविधा विस्कळीत झाल्यामुळे एकीकडे मागणी वाढत गेली, परंतु त्या मानाने पुरवठा कमी राहिला.
त्यामध्येच ब्राझीलच्या मका उत्पादनात वीस टक्के घट नोंदवली गेली. त्यामुळे अधिक चिंता वाढली. ब्राझीलमध्ये मक्याच्या उत्पादनात आणि काढणीत घट होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेमध्ये दुष्काळी स्थितीमुळे गव्हाच्या उत्पादनात घट होणार आहे. तर पूर्व युरोप आणि ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या पावसाने पिकाला फटका बसला आहे.त्यामुळे गव्हाच्य बाजारात परिणाम होण्याची शक्यता आहे.
मका गहू आणि सोयाबीनचे दर जागतिक वायदे बाजारात वाढले आहेत. शिकागो वायद्यांमध्ये देखील चीनची मागणी आणि वातावरणातील बदलाच्या भीतीमुळे सुधारणा झाली आहे. तसेच इंधन आणि गॅसच्या दरात सुधारणा झाल्यामुळे देखील कृषी निविष्ठांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मका, गहू आणि सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.
Published on: 20 November 2021, 08:49 IST