सध्या सोयाबीनची आवक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असून दाखल झालेले सोयाबीन हे ओले असल्यामुळे सोयाबीनला सध्या चार हजार दोनशे ते पाच हजार पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. कारण सध्या जे काही सोयाबीन बाजारपेठेत येत आहे त्याचा दर्जा घसरला असल्याने सोयाबीनला कमी बाजार भाव मिळत आहे. कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने जेव्हा धुमाकूळ घातला तेव्हा सोयाबीनचे काढणी ऐन जोमात होती.
नक्की वाचा:Soybean Bajar Bhav: सोयाबीनच्या दरात चढ की उतार? पहा आज किती मिळाला दर ?
या झालेल्या पावसामुळे बरेचसे सोयाबीन पावसात ओले झाल्याने त्याचा दर्जा घसरला आहे. तसेच या पावसामुळे सोयाबीन काढणीला ब्रेक लागल्यामुळे देखील बऱ्याच प्रकारच्या अडचणी आल्या. परंतु आता पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन काढण्याचे काम वेगाने सुरू असून आवक देखील वाढली आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी सोयाबीनची खेडा खरेदीत वाढ झाल्यामुळे शेतकरी बंधू गावातच सोयाबीनची विक्री करत असून त्यांच्या सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये ते 4700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळत आहे. परंतु यामध्ये एफ क्यू दर्जाच्या सोयाबीनला चार हजार नऊशे ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे.
नक्की वाचा:Ginger Price: आल्याचे भाव कोसळले! राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
पामतेलाच्या किमतीमध्ये झालेली वाढ आणि सोयाबीन बाजारभाव एकमेकांशी संबंध
पामतेलाच्या किमतींचा विचार केला तर त्यामध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळे सोयाबीनच्या बाजार भाव मध्ये 50 ते 100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परंतु जागतिक बाजारपेठेमध्ये जो उठाव सोयाबीनला पाहिजे तेवढा अजून देखील नाही.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अजून देखील सोयाबीनचे तर हे नरमलेले आहेत. जागतिक बाजारपेठेमध्ये पामतेलाच्या दरामध्ये स्थिरता नसून ते सातत्याने कमी जास्त होत आहेत. तसेच सोयाबीनचे बाजार भाव देखील थोड्या प्रमाणात कमी जास्त होत असून कधी घसरण तर कधी थोडीफार वाढ अशी सध्या चित्र आहे.
या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर शेतकरी बंधू पाच हजार रुपये प्रती क्विंटल तर सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सोयाबीन दराची पातळी लक्षात घेऊन सोयाबीनचे टप्प्याटप्प्याने विक्री करू शकतात. यावर्षी देखील सोयाबीनला 5000 ते 6000 रुपये प्रत्येक क्विंटल दरम्यान चा बाजार भाव मिळणार असल्याचे देखील जाणकार लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार भावाचा अंदाज बघून टप्प्याटप्प्याने विक्री करणे गरजेचे आहे.
Published on: 29 October 2022, 07:48 IST