News

गेल्या आठवड्याचा आपण जर विचार केला तर क्विंटल मागे कांद्याच्या दरात 300 ते 400 रुपये पर्यंतचे अनपेक्षित वाढ झाली होती.मागील आठवड्यामध्ये झालेली ही भाववाढचालू आठवड्यात वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु ती फोल ठरली आहे.

Updated on 29 September, 2021 2:45 PM IST

 गेल्या आठवड्याचा आपण जर विचार केला तर क्विंटल मागे कांद्याच्या दरात 300 ते 400 रुपये पर्यंतचे अनपेक्षित वाढ झाली होती.मागील आठवड्यामध्ये झालेली ही भाववाढचालू आठवड्यात वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु ती फोल ठरलीआहे.

अगोदरच शेतकरी पावसामुळे मेटाकुटीस आलेले आहेत.एकीकडे चाळीत साठवणूक केलेला कांदा माल खराब होत आहे.चिंता असतानाच अजून बाजार भाव कमी होतील की काय या भीतीपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता.यामुळे बाजारांमध्ये आवक वाढली आणि जो काही भाव मिळत आहे त्या भावाने उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्यानेशेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी हात आखडता घेतला होता.

 त्यामुळे मागील आठवड्यात तीनशे ते पाचशे रुपयांचीअनपेक्षित वाढ झाली होती.अपेक्षा होती की  अजून भाव वाढ होईल परंतु सोमवारी कांदा आवकेत उमराणे बाजारपेठेत वाढ झाली.मात्र बाजार भाव वाढण्या ऐवजी त्यामध्ये सरासरी दरात दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.अगोदर शेतकऱ्यांच्या पुरेसा कांदा शिल्लक नाही.जोकाहीकांदा शिल्लक आहे तो पावसामुळे खराब होत आहे.त्यामुळे कांदा विक्री करावा की नाही,याबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.

 

नांदगाव, येवला तसेच चांदवड  तालुक्यात गत आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने सुमारे सहा ते सात महिन्यापासून साठवलेला कांदा आता खराब व्हायला सुरुवात झाल्याने भावात पुरेशी वाढ दिसत असली तरी त्यातून शेतकऱ्यांचा  उत्पादन खर्च निघेल की नाही याची शाश्वती नाही. अगोदरच अतिवृष्टीमुळे बराच कांदा खराब झाला आहे.तसेच बऱ्याच ठिकाणी बोगस बियाण्यांमुळे कांदा खराब प्रतीचा निघाला होता.

English Summary: rate growth in onion market but not receive production cost to farmer
Published on: 29 September 2021, 02:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)