बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालन हे प्रामुख्याने दोन व्यवसाय करतात. बरेचसे शेतकरी हे आता कुक्कुटपालनकडे वळले असून पोल्ट्री ला आता व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. बरेच शेतकरी एक शेतीपूरक महत्त्वाचा उद्योग म्हणून पोल्ट्री कडे पाहतात. परंतु या पोल्ट्री व्यवसायाला मागील काही दिवसांपासून बर्ड फ्लू, तसेच मध्यंतरी आलेल्या कोरोनामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान सोसावे लागले.
चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या अफवेने अक्षरश: पोल्ट्री उद्योग रसातळाला जाण्याची वेळ आली होती. या संकटा मधून रस्ता काढत पोल्ट्री उद्योग टिकून आहे. परंतु या पार्श्वभूमीवर आता पोल्ट्री धारकां समोर नवीनच प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. तो म्हणजे पोल्ट्री खाद्याचे वाढलेले दर हे होय.
पोल्ट्री खाद्य दरात झाली वाढ
जर आपण पोल्ट्री खाद्याचा विचार केला तर त्यासाठी मका, सोया पेंड, शेंग पेंड त्यासोबतच तांदळाचा भुसा, मासळी आणि शिंपल्यांचा वापर केला जातो.
या सगळ्या घटकांचा जर आपण दरांचा विचार केला तर मका चा दर पंचवीस रुपये प्रति किलो, शेंग पेंड 52 रुपये प्रति किलो तसेच सोया पेंड 66 रुपये प्रति किलो, मासोळी 40 रुपये आणि सिंपले साठ रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. या सगळ्यांचा परिणाम हा एकूण खाद्य दर वाडीत झाल्याने खाद्य दरात तब्बल 60 ते 70 टक्के वाढ झाली आहे.
जर पोल्ट्री खाद्य तयार करण्याचा विचार केला तर प्रति किलो 28 रुपयांपर्यंत खर्च येत आहे. यामध्ये आणखी दहा रुपयांची वाढ झाली असून अगोदर हा खर्च उत्पादनाच्या 80 टक्के होता तर तो आता 120 टक्क्यांवर गेला आहे. त्यामानाने पोल्ट्री धारकांना प्रति अंड्यामागे सव्वा रुपये तोटा सहन करावा लागत आहे. अंड्यांचे उत्पादन खर्चाचा विचार केला तर तो साडेचार रुपये आहे आणि अंड्याची विक्री तीन रुपये 40 पैशांनी करावी लागत आहे.
त्यामुळे पोल्ट्री मालकांनी अंड्याचा विक्री दर वाढवावा किंवा यावर अनुदान द्यावे तर हा व्यवसाय टिकेल असे पोल्ट्री धारकांचे म्हणणे आहे. एकूण खाद्य दरात 60 ते 70 टक्क्यांनी वाढ झाल्याने दर हजारी कोंबड्यांचा विचार केला तर पोल्ट्री मालकाला 20 हजार रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
Published on: 18 March 2022, 07:35 IST