मधील काही महिन्या अगोदर टोमॅटोचे बाबत कमालीची घसरण झाली होती. शेतकऱ्यांना अक्षराच्या टोमॅटो रस्त्यात फेकून द्यायची वेळ आली होती. परंतु त्यानंतर अचानक पुरवठा कमी झाल्याने टोमॅटोच्या भावाने संपूर्ण देशात उच्चांकी पातळी गाठली होती.
देशभरात टोमॅटोची पुरवठा वाढल्याने दरात मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल 12.89 टक्क्यांनी आणि गेल्या महिन्याच्या तुलनेत 23.89 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे राजस्थान मधील टोमॅटो मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाल्याने गाव बाजाराची टोमॅटोच्या दरात आणखी घट होईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
संपूर्ण भारतीय तिचा विचार केला तर टोमॅटोच्या दरात मागच्या आठवड्यात तुलनेत चालू आठवड्यात 12.89 टक्के घसरण झालेली दिसून येत आहे.
संपूर्ण महिन्याच्या टोमॅटोच्या भावाचा विचार केला तर मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात टोमॅटो 23.69टक्क्यानी स्वस्त झालेले दिसतात. देशातील प्रमुख शहरांमध्ये 21 डिसेंबर या दिवशी टोमॅटोचे दर फार प्रमाणात कमी झाले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि दिल्ली या राज्यातील मुख्य बाजारांमध्ये टोमॅटोची आवक प्रचंड वाढल्यामुळे मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळाली.
राजस्थानातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात दाखल झाला आहे आणि इतर राज्यातील टोमॅटो देखील डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बाजारात येतील अशी अपेक्षा आहे. त्याचा परिणाम हा टोमॅटोचे दर आणखी उतरण्यात होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये टोमॅटोच्या पुरवठ्यात निर्माण झालेला जो अडथळा होता तो आता पाऊस बंद झाल्यामुळे कमी झाला आहे. त्यामुळेही टोमॅटोच्या दरात घसरण झालेली दिसून येत आहे.
Published on: 26 December 2021, 09:19 IST