Mumbai News : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मंत्रालयात आज बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्यातील पिक पाण्याचाही आढावा घेण्यात आला. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली ही बैठक पार पडली आहे.
औरंगाबाद विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे. याबाबत सीएमओ ऑफीसच्या अकाउंट वरुन अधिकृत ट्वीट करुन ही माहिती देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय
१) राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती.
२) सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार. ३) ३) सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये
४) पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
५) फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
६) भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन
७) विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता
Published on: 10 October 2023, 02:51 IST