कृषी महाविद्यालय अकोला येथे तृतीय वर्षात शिकणाऱ्या रा. से. यो. स्वयंसेवक राम सतीश कुमार चांडक याची महाराष्ट्र शासन, युनिसेफ व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने विद्यापीठ रा. से. यो. सोशल मीडिया समन्वयक म्हणून विद्यापीठा तर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक आच्या रुपात काल मर्यादित स्वरूपात आहे. त्यांना राज्य शासनाच्या वतीने पाचगणी जिल्हा सातारा येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
NSS चे पूर्ण रूप राष्ट्रीय सेवा योजना आहे, जे NSS म्हणून लोकप्रिय आहे, भारताच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत. (NSS information in Marathi) एनएसएस हा भारत सरकार पुरस्कृत एक सार्वजनिक सेवा कार्यक्रम आहे.
ही योजना १ 1969 मध्ये गांधीजींच्या शताब्दीच्या वेळी सुरू करण्यात आली होती, ज्याचा उद्देश विविध सामुदायिक सेवांद्वारे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित करणे आहे.
NSS चे पूर्ण रूप राष्ट्रीय सेवा योजना आहे. राष्ट्रीय सेवा योजना “मी नाही पण तू” या बोधवाक्यावर कार्य करते म्हणजेच त्याच्या उपक्रमांमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी समाजातील लोकांसह समाजाच्या हितासाठी कार्य करतात. आज या योजनेअंतर्गत लोकांना भरपूर लाभ मिळत आहेत, साक्षरतेशी संबंधित काम,
पर्यावरण संरक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, आपत्कालीन किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ग्रस्त लोकांना मदत इ.
कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना मध्ये नेहमीच अग्रेसर असतात, या महाविद्यालय मध्ये अनेक विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड इथूनच निर्माण झाली आहे आणि आज या महाविद्यालयातील विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत.
त्याच प्रमाणे राम याने महाविद्यालय स्तरावर तसेच विद्यापीठ स्तरावर रासेयो स्वयंसेवकांसाठी सोशल मीडियाचे विविध प्रशिक्षण शिबिर घेतले आहे. या प्रशिक्षण शिबिर मध्ये सोशल मीडियाचा योग्यप्रकारे वापर सोशल मीडिया वापरतांना घेतली जाणारी काळजी
तसेच सोशल मीडियाचा वापर करून राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचणार याचे प्रशिक्षण दिले आहे.
महाविद्यालय स्तरावर ही यंत्रणा राबवण्यासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. कुबडे पं. दे. कृ. वि, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ एस.एस माने, महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.संदीप लांबे , प्रमुख विस्तार शिक्षण शाखा, डॉ.अनिल खाडे सहा. प्राध्यापक विस्तार शिक्षण तथा कार्यक्रम अधिकारी रासेयो यांनी मेहनत घेतली
विद्यापीठ सोशल मीडिया समन्वयक या पदावर नियुक्तीनंतर रामचे हे ध्येय आहे की विद्यापीठ स्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व कार्यक्रमांना ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देणे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या कामांचा प्रचार-प्रसार करणे सोबतच सोशल मीडियाचा वापर करून सर्व स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेत कार्य करण्यासाठी प्रेरित करणे व त्यांचा उत्साह वाढवणे हे आहे. त्यासाठी रामने विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सोशल मीडिया अकाउंट तयार केले आहेत ज्याद्वारे तो आपले पुढील कार्य राबवणार असे सांगण्यात येत आहे.
प्रतिनिधी- गोपाल उगले
Published on: 01 April 2022, 08:11 IST