New Delhi News : केळी उत्पादक शेतकऱ्यांचा फळ पीक विमाबाबत असणाऱ्या समस्या खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्यासमोर मांडल्या आहेत. तसंच फळ पिक विमा योजना आंबिया बहार २०२२ प्रलंबित लाभ बाबत शेतकरी तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. यावेळी खडसे यांच्यासोबत केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व श्रीमती शोभा करंदलाजे यांची देखील उपस्थित होत्या.
रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे. यावेळी खडसे यांनी फळ पिक विमाधारक शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, रक्षा खडसे यांची मागणी ऐकून घेतल्यावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी येत्या ३/४ दिवसात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिले आहे.
Published on: 05 December 2023, 06:21 IST