News

Rakesh Tikait Bengaluru: भारतीय किसान युनियनचे नेते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर आज शाईफेक झाली. बंगळुरूत राकेश टिकैत यांची पत्रकार परिषद होती. यावेळी अचानक राकेश टिकैत यांचयावर एका व्यक्तीने शाई फेकली. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

Updated on 30 May, 2022 3:13 PM IST

Rakesh Tikait Bengaluru: भारतीय किसान युनियनचे नेते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर आज शाईफेक झाली. बंगळुरूत राकेश टिकैत यांची पत्रकार परिषद होती. यावेळी अचानक राकेश टिकैत यांचयावर एका व्यक्तीने शाई फेकली. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

बंगळुर येथील गांधी भवनमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर सिंह हे पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. या दरम्यान, एका व्यक्तीने त्यांच्यावर काळी शाई फेकली. हे दोन्ही शेतकरी नेते एका स्टिंग ऑपरेशनबाबत भाष्य करण्यासाठी आले असल्याचे म्हटले जाते.

पोरी मानलं तुला! 11वीच्या विद्यार्थिनीनं शेतात पाणी देण्यासाठी बनवली सोलर सायकल; पंपाविना करता येणार सिंचन

स्टिंग ऑपरेशनमध्ये काय?

एका स्थानिक वृत्तवाहिनीने कर्नाटकमधील शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. चंद्रशेखर हे पैशांची मागणी करताना कॅमेऱ्यात कैद झाले. या व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यासाठी टिकेत आणि युद्धवीर पत्रकार परिषदेत आले होते. चंद्रशेखर यांना कोणत्याही परिस्थितीत आमचा पाठिंबा नसून शेतकऱ्यांना धोका करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राजेश टिकेत करणार होते.

Monsoon Breaking : आला रे आला पाऊस आला ! केरळमध्ये मान्सून दाखल; राज्यातील पावसाची तारीख ही ठरली..

राकेश टिकेत यांनी या प्रकरणी कर्नाटक सरकारवर आरोप केले होते. कर्नाटक पोलिसांनी पुरेशी पोलीस सुरक्षा व्यवस्था न पुरवल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारचा या घटनेला पाठिंबा असल्याचे ही सांगितले.

Business Idea: नोकरी नसतानाही करोडपती व्हा; 5000 रुपये गुंतवा आणि घरी बसून महिन्याला 3 लाख रुपये कमवा

English Summary: Rakesh Tikait: Shifek on farmer leader Rakesh Tikait
Published on: 30 May 2022, 03:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)