News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल (दि.२) कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत तुपकर यांनी पक्षातंर्गत असणारे मतभेद चव्हाट्यावर आणलेत.

Updated on 01 September, 2023 2:47 PM IST

सांगली 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणताही वाद नाही. तसंच रविकांत तुपकर देखील नाराज नाहीत, असा खुलासा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. तुपकर नाराज असल्याच्या चर्चा झाल्यानंतर शेट्टी यांनी प्रसार माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी शेट्टी म्हणाले की, "येत्या आठ दिवसांमध्ये शिस्त पालन समितीची बैठक होणार होणार आहे. त्या बैठकीला राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. या बैठकीला रविकांत तुपकर यांना देखील बोलावण्यात आले आहे. तसंच त्यांचे ज्या कुणासोबत वाद असतील त्यांना देखील बोलावून हे समज-गैरसमज मिटवले जातील."

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल (दि.२) कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत तुपकर यांनी पक्षातंर्गत असणारे मतभेद चव्हाट्यावर आणलेत. यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, "आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत आहे , माझ्या ऐवजी दुसरे कोणी असतं तर आत्महत्या केली असती" अशा शब्दात तुपकर यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली खंत व्यक्त केली. तसंच मला संघननेतून बाहेर काढण्याचा हालचाली सुरु आहेत, असंही तुपकर यावेळी म्हणाले आहेत.

English Summary: Raju Shetty spoke clearly about Ravikant Tupkar's displeasure
Published on: 03 August 2023, 06:16 IST