राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकरी आळशी आहेत असे विधान केले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी म्हणणारे शरद पवार आणि नितीन गडकरी हेच खरे साखर उद्योगाचे लाभार्थी असल्याचे वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शरद पवारांचे राजकारण हे साखर उद्योगावर व ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अनेक साखर कारखाने असल्याचे शेट्टी म्हणाले. तर हरभरा, केळी, हळद, ऊस, कापूस या पिकात उसापेक्षा जास्त पैसा मिळतो.
उसात शाश्वत पैसा मिळतो म्हणून शेतकरी ऊस पीक घेतो असेही शेट्टी म्हणाले. त्यामुळे शरद पवार व नितीन गडकरी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांविषयी असं बोलणं चुकीचं असल्याचे शेट्टी म्हणाले.
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कृषी यंत्रावर मिळणार अनुदान
दिवसभर शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. त्यामुळं उभे पिके करपतात. उभा ऊस जळून जातो हे प्रश्न महत्वाचे आहेत असे शेट्टी म्हणाले. तापमान वाढीमुळे ळी पिकाचे मोठे नुकसान होत आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढीने मशागत खर्च वाढला, गाळप हंगाम संपत आला तरी शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शेतात उभा आहे यावर कुणी बोलायला तयार नाही असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
माती परीक्षण काळाची गरज...
Jackfruit : फणस प्रक्रिया आणि आरोग्यदायी फायदे
Published on: 02 May 2022, 02:51 IST