सध्या राजू शेट्टी यांचेशेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी,तसेच वीज बिलामध्ये दुरुस्ती करावीया व अशा अनेक मागण्यांसाठी सलग सातव्या दिवशी देखील आंदोलन सुरू आहे
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटले की, शुक्रवार पर्यंत जर याबाबत कुठलाही प्रकारचा निर्णय जर झाला नाही तर आंदोलन आक्रमक व निराळ्या पद्धतीचे असेल असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला. त्यासोबतच कोणत्या नेत्यांनी कोणत्या वीज प्रकल्पाच्या माध्यमातून पैसे लुटायला सुरुवात केली आहे याचे देखील बिंगयेत्या आठवडाभरात फोडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले की, जर एक वीज प्रकल्प उभा करायचा असेल तर त्याला पंधरा ते वीस कोटी रुपयांचा खर्च हा येतो.
हीच विज महावितरणला विकली तर वर्षभरात हा पैसा वसूल होतो.परंतु त्यापुढे वीस वर्षे शेतकऱ्यांना लुटले जाते.शासनाच्या कंपन्या बंद करून या कंपन्या विकत घेण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे परंतु ते हाणून पाडावे लागेल असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे दोन मंत्री मला भेटून गेले आहेत.त्यांनी दोन दिवस थांबायला सांगितले आहे.त्यामुळे अजून दोन दिवस म्हणजे शुक्रवारपर्यंत वाट पाहणार आहे.जरजोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र यापुढे आंदोलन उग्र स्वरूपाचे असेल.एवढेच नाही तरनिवडून दिलेले आमदारच तर या विषयावर अधिवेशनात तोंड उघडणार नसतील तर त्यांना सुद्धा गाव बंद केले जाईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.इतकेच नाही तर ही रास्त मागणी करताना जर खटले दाखल केले गेले तर सर्व खटल्याचे कामकाज वकील मोफत करतील अशी ग्वाही या शिष्टमंडळाने दिली.
Published on: 01 March 2022, 12:49 IST