News

यंदा राज्यामध्ये उसाचे क्षेत्र किती आहे हे माहीत असून सुद्धा उसाच्या गाळपाबाबत राज्य सरकार नियोजन करण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहे. या चुकीच्या नियोजनामुळे यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. महाविकास आघाडीचा सर्व मोठा अपयशी प्रश्न असेल तर तो म्हणजे शिल्लक ऊस. अशी महाविकास आघाडी सरकारवर टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केलेली आहे. जे की पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की शिल्लक ऊस हे महाविकास आघाडीचे मोठे अपयश आहे.

Updated on 23 April, 2022 2:16 PM IST

सरकारचे नियोजन नाही :-

राजू शेट्टी म्हणाले की कारखाना क्षेत्रामध्ये जरी ऊस शिल्लक आहे तरी कारखाना बंद होत आहे ही अगदी गंभीर च बाब आहे. ऊस हा अचानकपणे उगवलेला नाही जे की उसाची १४ ते १६ महिन्यांपूर्वी लागण झालेली आहे. राज्यात यंदा उसाचे किती प्रमाणात क्षेत्र आहे हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते. राज्यात जवळपास १९० कारखाने चालू  आहेत.  जे  की  कारखान्यांची  गाळप क्षमता किती आहे हे सरकार ला देखील माहीत होते. मात्र या सर्वांचा हिशोब करून राज्यात किती अतिरिक्त ऊस राहू शकतो हे सरकारला आधीच लक्षात यायला पाहीजे होते.

खाजगी कारखान्यांच्या मालकाच्या माणगुटिला धरा :-

राज्यामध्ये सुमारे ४०-५० कारखाने असे आहेत जे चालू बंद अवस्थेत आहेत मात्र त्या कारखान्यांच्या मालकांच्या माणगुटीला धरून सरकारने सांगायला पाहिजे होते की एक तर तुम्ही स्वतः कारखाने चालू ठेवा अथवा सक्षम यंत्रणेकडे कारखाने चालवायला द्या. कारखान्यांच्या क्षेत्रात जेवढा ऊस यायचा आहे तेवढा ऊस आम्हाला गाळप करायचा आहे. तर जे कारखाने बंद झाले आहेत ते कारखाने ५-१० वर्षाच्या करारावर देऊन सक्षम यंत्रणेला चालवायला दिले पाहिजेत आणि अतिरिक्त उसाची विल्हेवाट लावली पाहिजे होती. मात्र हे सर्व निर्णय घ्यायला सरकार कमी पडले असल्याने शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे.

तर स्वाभिमानी कायदा हातात घेईल :-

महाविकास आघाडी सरकार ला कोणतेही पूर्वनियोजन करता येत नाही त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत च निघाले आहे. सरकारला वीजपुरवठा देखील करता येत नाही तसेच डीपी बंद ठेवून शेतकऱ्यांना अडवून धरले आहे. जर महावितरणने योग्य ते पाऊल उचलले नाही तर शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कायदा हात घेईल असा इशारा श्री. राजू शेट्टी यांनी दिलेला आहे.

English Summary: Raju Shetty criticizes Mahavikas Aghadi government over remaining sugarcane
Published on: 23 April 2022, 02:16 IST