महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची (Swabhimani Shetkari Sanghatana) पहिली बैठक राष्ट्रवादीची बालेकिल्ला येथे होत आहे. स्वाभिमानीचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी (Former MP Raju Shetty) यांची बुधवारी 20 एप्रिल रोजी भवानीनगर (ता.इंदापूर) येथे जाहीर सभा होणार आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी अधिक आक्रमक झाले आहेत. भवानीनगर (ता.इंदापूर) येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता छत्रपती पालखी मैदान, छत्रपती सहकारी साखर कारखाना (Chhatrapati Sahakari Sugar Factory) येथे होणार आहे. हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून जातो.
या मागण्यांसाठी बळीराजा हुंकार यात्रा
१. उसाला एकसमान एफआरपी मिळावी.
२. दुधाला हमी भाव मिळावा.
३. भूसंपादन कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात.
४. शेतीला दिवसा दहा तास वीज द्यावी.
५. रासायनिक खतांचा दर पाठीमागे घ्यावा.
या विविध मागण्या घेऊन महाराष्ट्रात बळीराजा हुंकार यात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Onion Rate : कांद्याला निच्चांकी भाव, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
Central Government : अतिरिक्त खताच्या वापराबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
Published on: 18 April 2022, 12:09 IST