स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद 15 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे विक्रम सिंह क्रीडांगण मैदानावर होणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. तसेच "जागर एफआरपीचा संघर्ष ऊसदराचा" यासाठी ते सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये सलग नऊ दिवस मोठ्या सभा देखील घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
नक्की वाचा:Agri News: 'या'विद्यापीठाच्या तीन वाणांचा 'नॅशनल गॅझेट'मध्ये समावेश,वाचा याबद्दल माहिती
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून महाविकास आघाडी सरकारचा निर्णय या सरकारने तातडीने रद्द करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीदेखील केली असल्याचे त्यांनी सांगितले.पुढे त्यांनी म्हटले की,उसाच्या शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे परंतु त्या प्रमाणामध्ये देण्यात येणाऱ्या एफआरपीमध्ये वाढ झालेली नाही.
नक्की वाचा:कृषी सेवक चा पगार आता 19 हजार पर्यंत
याउलट केंद्र सरकारने एफआरपीचा बेस वाढवून 10.25 टक्क्यांवर वाढवून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. एकरकमी एफआरपी हा शेतकऱ्यांना कायद्याने दिलेला हक्क आहे असे असताना देखील त्याचे दोन तुकडे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती सरकारने कालवली आहे असे त्यांनी म्हटले.
24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत नऊ दिवस सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यात जागर यात्रा काढणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले व 21वी ऊस परिषद जयसिंगपूर मध्ये 15 ऑक्टोबरला होणार आहे.
एवढेच नाही तर एफआरपीचा दोन तुकड्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द करावा. जोपर्यंत सरकार कडून एकरकमी एफआरपीचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही अशी देखील त्यांनी म्हटलंय.
Published on: 11 September 2022, 10:20 IST