गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. महागाई वाढल्यामुळे उसाचा भाव वाढवा अशी त्यांची मागणी आहे. असे असताना आज ऊस दरासाठी निर्णायक ठरणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची (Swabhimani Shetkari Sanghatana) 21 वी ऊस परिषद आज होणार आहे.
यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुपारी एक वाजता या परिषदेला सुरुवात होणार असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत या परिषदेची सांगता होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये ही परिषद होणार असून, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन राजू शेट्टींनी केलं आहे. पाऊस आला तरी ही परिषद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या साखरेची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात साखर निर्यात झाली आहे. इथेनॉल आणि कच्च्या साखरेचे दरही अधिक आहेत. ब्राझिलमध्ये यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षात भारताच्या साखरेला जागतिक बाजारात चांगली मागणी असेल. उत्पादनात आता भारताचा पहिला नंबर लागतोय.
आता निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा मिळणार मदत, राज्य सरकारचा मोठा निर्णय
यामुळे आता सर्व पाहता साखर कारखान्यांना वाढीव एफआरपी देणे शक्य आहे. तसेच कारखाने जी उपउत्पादने बनवतात, त्याचीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असल्याचे शेट्टी म्हणाले. सध्या खतांचे तसेच मजुरीचे वाढलेले दर, साखर कारखान्यांना झालेला नफा लक्षात घेऊन एफआरपीची रक्कम अधिक मिळावी, अशी या परिषदेत आमची मागणी असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले.
तसेच त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, अजित पवार शेतकऱ्यांना सल्ला देतात की, ज्यादा पैसे देण्याऱ्या, एकरकमी पैसे देण्याऱ्या कारखान्यांनाच ऊस द्या. पण तुम्ही उपमुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेऊन एकरकमी FRP चे दोन तुकडे करण्याचा कायदा विधानसभेत मंजूर करुन घेतला.
दिवाळीच्या तोंडावर शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा शॉक, वीज दरवाढ होणार
यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तुम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना असा सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल शेट्टी यांनी केला. यामुळे आता या ऊस परिषदेत राजू शेट्टी काय भूमिका मांडणार याकडे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता जमीन खरेदीसाठी सरकार देणार 100 टक्के अनुदान, जाणून घ्या सविस्तर..
पावसात जनावरे दगावली तर मिळणार मदत, शेती पाण्याखाली शेती गेली की मिळणार तत्काळ मदत..
आपत्ती मदत रकमेत ५० टक्क्यांनी वाढ, आता पूर-पाऊस आणि पिकांचे नुकसान झाल्यास अधिक भरपाई दिली जाणार
Published on: 15 October 2022, 11:21 IST