संगणक क्रांतीचे जनक माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी व माजी खासदार व पुरस्कार सोहळ्याचे जनक स्व. राजीव सातव यांना शेतकऱ्यांच्या वतीने अभिवादन.
मुंबई येथे राज्यातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा कौतुक सोहळा भव्य दिव्य पणे संपन्न.राजीव गांधींनी केलेल्या संगणक क्रांतीमुळे शेतकऱ्यांची प्रगतीकडे वाटचाल-माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार राज्यातील २६ प्रगतशील शेतकऱ्यांसह उत्कृष्ट तिफणकारी शेतमजुराचा तिफण प्रदान करून वैशिष्ट्यपूर्ण भावस्पर्शी सन्मान करण्यात आला.
श्री प्रकाश जी साबळे यांनी हा पुरस्कार प्राथमिक स्तरावरील कार्यक्रमापासून ते आज राज्यातील शेतकऱ्यांना आपला वाटणारा पुरस्कार अशी या पुरस्काराची ख्याती आहे.जय जवान जय किसान आणी जय विज्ञान अशी हाक देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानात भारताला पुढे नेणारे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी २१मे ला हा पुरस्कार देणे सुरू केला. स्वता शेतकरी यांची निवड न करता एक स्वतंत्र निवड समिती केली.जवळचे किंवा नातेवाईक यामधे सरांनी थारा दीला नाही.कारण यामधे प्रगतिशील शेतकरी यांनाच पुरस्कार दील्या गेले. कृषी शास्त्रज्ञ,महिला शेतकरी व मजुर वर्ग यांचा समावेश केला. प्रेरणादायी विचाराचं व्यक्तीमत्व असलेले श्री प्रकाश जी साबळे सर यांचं उपक्रमाचे कौतुक सर्वच स्तरातून केले जातआहे.
अमरावती जिल्हा सोयाबीन उत्पादक संघ या ३ हजार शेतकरी सदस्य असलेल्या संस्थेची प्रकाश साबळे यांना मदत होते. ते खुद्द या संस्थेचे अध्यक्ष आहे.कमी खर्चात जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या पुरस्कारात स्मृतिचिन्ह, शाल,श्रीफळ देऊन गौरविण्यात येते. लोकवर्गणीतून कोणतीही शासकीय मदत न घेता काम करणाऱ्या साबळे सरांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या श्रमाची कहाणी पोहचवली या मागचा उद्देश एकच एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ
पुरस्कारांमध्ये कृषीमित्र, कृषीमित्र,कृषी वैद्यांनीक, महिला शेतकरी, कृषी पत्रकार, शेतकरी उत्पादक कंपनी यांना मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा प्रकाश साबळे यांचे गेल्या १६ वर्षांपासून शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन.
या प्रसंगी राजीव गांधी कृषिरत्न शेतकरी निवड समितीचे अध्यक्षा सौ. पोर्णिमाताई सवाई, अशोकरावजी मोरे, भैय्यासाहेब निचळ, प्रा. दिलीपराव काळे प्रा अमर तायडे, प्रा हेमंत डिके, विलास सवाने, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले .
Published on: 22 May 2022, 01:53 IST