News

राजस्थानच्या शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता तेथील शेतकऱ्यांना त्यांच्या कुठल्याही कामासाठी सरकारी कार्यालयांचे फेरफाटे मारण्यापासून आराम मिळणार आहे. यासाठी राजस्थान सरकार कडून शेतकऱ्यांसाठी राज किसान साथी पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे.

Updated on 04 September, 2021 9:45 AM IST

 राजस्थानच्या शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता तेथील शेतकऱ्यांना  त्यांच्या कुठल्याही कामासाठी सरकारी कार्यालयांचे फेरफाटे मारण्यापासून आराम मिळणार आहे. यासाठी राजस्थान सरकार कडून शेतकऱ्यांसाठी राज किसान साथी पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे.

 या पोर्टलच्या माध्यमातून शेती मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यास वाव मिळेल. तसेच इज ऑफ डुइंग फार्मिंग च्या माध्यमातून विकसित या पोर्टल द्वारे शेतकऱ्यांचे बरीचशी कामे हे ऑनलाईन होतील. या प्रोजेक्टच्या माध्यमातून कृषी आणि कृषी संबंधित जवळजवळ 144 मॉड्यूल विकसित करण्यात येणार आहेत.  या पोर्टलच्या माध्यमातून अर्जापासून ते पेमेंटची प्रक्रिया हे सगळे ऑनलाईन होणार आहे.

 राज किसान साथी पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांची माहिती आणि अर्धा ची सुविधा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून अर्जाची प्रक्रिया एक सरळ, सोपी आणि पेपरलेस बनवण्यात आली आहे. या अगोदर शेतकऱ्यांना कुठल्या योजना संबंधित ची फाईल जमा करण्यासाठी आणि त्या फाईलची  स्टेटस पाहण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागायचे परंतु आता या पोर्टलच्या माध्यमातून फाईलच्या मोव्हमेन्टवरऑनलाइन नजर ठेवता येईल.

 

 या पोर्टल ला कृषी विभागाच्या विविध योजना जोडण्यात येणार आहे. आतापर्यंत कृषी विभागाच्या सहा योजना आणि त्यांच्या लायसन्स प्रक्रिया तसेच उद्यान विभागाच्या आठ योजना आणि कृषी पणन विभागाच्या दोन योजनांना या पोर्टल ला  जोडण्यात आली आहे.  तसेच राज किसान साथी पोर्टलवरशेतकरी, व्यापारी आणि कामगारांसाठी आठ मोबाईल ॲप बनवले गेले आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून बियाणे आणि खाद्य,कीटकनाशकांचे परवाने सुद्धा ऑनलाइन बनत आहे.

English Summary: raj kiaan sathi portal launch by rajsthan goverment
Published on: 04 September 2021, 09:45 IST