गेल्या काही दिवसांपासून शेतकरी (farmer)राजावर वेगवेगळ्या प्रकारची संकटे ओढवत आहे. त्यात खरीप हंगामातील झालेले नुकसान आणि आता अवखळी पावसामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे.शेतीत पिकासाठी घातलेला खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. मागील आठवड्यापासून राज्यातील अनेक वेगवेगळ्या भागात अवखाळी पाऊस हजेरी लावत आहे. परंतु या अवखळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
द्राक्षाला तडे गेले आहेत:
पुणे जिल्ह्यात असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील द्राक्षे बागतदार पूर्णपणे अडचणीत सापडलेले आहेत. हाता- तोंडाला आलेल्या बागेचे अवखळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान बरोबर तोडणी च्या वेळी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे नुकसान आलेले आहे.या बागांच्या फळ खरेदी साठी व्यापारी सुदधा येणार होते. मात्र ऐन वेळी झालेल्या अवखळी पावसामुळे पावसाचे पाणी द्राक्षांच्या घडातच साठून राहिल्याने द्राक्षाला तडे गेले आहेत. त्यामुळे यंदा च्या वर्षी असा माल बाजार विकेलच की नाही हे अजिबात सांगता येणार नाही.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावचे देविदास पुणेकर हे 12 वर्षापासून द्राक्षे फळाचेे उत्पादन घेत आहेत. परंतु ह्या वर्षी त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेवटच्या वेळी बागेचे नुकसान झाल्यामुळे ते सुद्धा निराश झाले आहेत.यंदा च्या वर्षी द्राक्ष बागायदारांना पिकाला चांगला भाव मिळेल याची मोठी आशा होती परंतु ऐन तोडणीचा वेळी पडलेल्या अवखळी पावसामुळे द्राक्षांच्या घडात पाणी साचून राहिल्याने द्राक्षांचे घड खराब झालेले आहेत. त्यामुळं व्यापारी वर्ग या प्रकारची खरेदी करेल की नाही याची चिंता द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे.
ज्या द्राक्ष उत्पादनातून देविदास पुणेकर यांना चार पैसे मिळणार होते आता तेच द्राक्षे बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे. या अवखळी पावसामुळे कमीत कमी 60 टक्के नुकसान हे बागांचे झाले आहे. परंतु पाणी साचून राहिल्यामुळे राहिलेले पीक सुद्धा पदरात पडेल की नाही यात सुदधा शंका निर्मान झाली आहे
Published on: 18 November 2021, 03:57 IST