राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी, संपूर्ण राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती कायम आहे. शुक्रवारी (ता. २९) पूर्व विदर्भ, राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर ऑगस्टमध्ये पावसाची परिस्थिती काय असेल याबाबतही अंदाज व्यक्त करण्यात आलाय.राज्यात गुरुवारी २८ सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली, तर उर्वरित राज्यातील काही भागात हलक्या सरी पडल्या. एकीकडे पावसाचा जोर ओसरला आहे,
तर दुसरीकडे ऊन-सावलीचा खेळ सुरू असून तापमानातही काहीशी वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३४.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले.सध्या मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पूर्व भाग उत्तरेकडे गेला असून, पश्चिम भाग दोन दिवसांत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. तमिळनाडू व लगतच्या परिसरावर आणि बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.A cyclonic wind condition has developed in the Bay of Bengal.राज्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी (ता. २९) विजांसह पाऊस पडेल. उर्वरित राज्यात मात्र हलक्या सरींची शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भासह राज्यात ढगाळ हवामान असून, अनेक ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत असल्याचे दिसून आले आहे.पावसाचा येलो अलर्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली महाबळेश्वर येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस : गुरुवारी
(ता. २८) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्वर येथे ३ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद १७.३ अंश सेल्सिअस महाबळेश्वर येथे झाली. मात्र सायंकाळी सातनंतर विजांच्या कडकडासह पावसाच्या जोरदार सरींना सुरुवात झाली. सध्या राज्यात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी पडत आहेत.पुढील चार आठवड्यांची स्थिती : हवामानशस्त्र विभागाने राज्यात पुढील चार आठवड्यांचा पावसाचा अंदाज गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार पहिल्या आठवड्यात म्हणजेच २९ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची काहीशी उघडीपच पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर हळू हळू वाढण्याची शक्यता आहे.
Published on: 29 July 2022, 01:27 IST