News

गेल्या काही दिवसांपासून राज्याचा सतत संतधार पाऊस कोसळत आहे. रोजच्या रोज नियमित पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अक्षरशः बरीच शी पिके ही पाण्याखाली गेली आहेत.पाऊस जरी या वर्षी पडला असला तरी याचा परिणाम हा पुढच्यावर्षी दिसणार आहे. यात म्हणजे सर्वात मोठे नुकसान हे शेतकरी वर्गाचे आहे. तुमच्या पैकी बरेचसे लोक विचार करत असतील की पावसामुळे कोणता परिणाम होणार आहे आणि शेतकऱ्यांना तोटा कसा होणार आहे या बद्दल विचार करत असतील.

Updated on 10 October, 2021 12:16 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्याचा सतत संतधार पाऊस कोसळत आहे. रोजच्या रोज नियमित पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अक्षरशः बरीच शी पिके ही पाण्याखाली गेली आहेत.पाऊस जरी या वर्षी पडला असला तरी याचा परिणाम हा पुढच्यावर्षी दिसणार आहे. यात म्हणजे सर्वात मोठे नुकसान हे शेतकरी वर्गाचे आहे. तुमच्या पैकी बरेचसे लोक विचार करत असतील की पावसामुळे कोणता परिणाम होणार आहे आणि शेतकऱ्यांना तोटा कसा होणार आहे या बद्दल विचार करत असतील.

पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीनचे पीक पूर्णपणे खराब झालेले आहे:

या वर्षी सर्वत्र जोरदार पाऊस (rain)पडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला आहे की अनेक पिके पाण्याखाली सुद्धा गेली आहेत. या पावसाचा सर्वात मोठा परिणाम हा आगामी खरीप हंगामावर झालेला आहे.चालू वर्षी आगामी खरीप हंगामात पेरणीच्या वेळी शेतकरी राजाला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.कारण पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन चे पीक पूर्णपणे खराब झालेले आहे. काही ठिकाणी तर सोयाबीन ला जागेवरच कोंब उगवले आहेत त्यामुळं बऱ्याच ठिकाणी सोयाबीन खराब झालेले आहे. त्यामुळे पुढील हंगामात सुद्धा याचे शेतकरी वर्गाला सोसावे लागणार आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम बीजोत्पादनावर होणार आहे.

बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांना अडचणी:-

जर का पिकाचा दर्जा हा योग्य असेल तरच त्याचे बियाणे सुद्धा उत्तम दर्जाचे तयार करता येते. परंतु यंदा च्या वर्षी जास्त पावसामुळे मोठ्या प्रमाणात  पिकाचे  नुकसान  झाले  आहे. त्यामुळे बऱ्यापैकी पिके खराब झालेली आहेत. त्यामुळं यंदा च्या वर्षी पीक उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे त्यामुळे पुढील हंगामात बियाणांचा भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची चर्चा सर्वत्र आहे.

तसेच सर्वात जास्त सोयाबीन हा अकोला जिल्ह्यात पिकतो परंतु पावसामुळे तेथे सुदधा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या वर्षी 50 टक्क्यांपेक्षा  सुद्धा  जास्त  सोयाबीनचे  नुकसान  झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी बीजोत्पादन हे सुद्धा कमी प्रमाणात होणार  आहे आणि नंतर त्याच्या मागणी प्रकियेत सुद्धा वाढ होणार आहे.बियाणांची मागणी  वाढली की दर हे  आपोआपच वाढणार अशी शंका व्यक्त केली आहे. यामुळे येणाऱ्या पुढील हंगामात शेतकऱ्याला अर्धीक पाठबळ जात लागणार आहे.

English Summary: Rains will affect the upcoming season, seed production will decrease and rates will increase
Published on: 10 October 2021, 12:16 IST