नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) यंदाचा परतीचा प्रवास अखेर संपला. राज्यासह संपूर्ण देशाचा निरोप घेत मॉन्सून बाहेर पडला आहे.त्यामुळे आता दक्षिण भारतातील राज्यात ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला सुरवात झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.यंदा वेळे आधीच मॉन्सूनने देशात आगमन केले होते. या वर्षी मॉन्सून सर्वसाधारण
वेळेच्या तीनदिवस आधी म्हणजेच २९ मे रोजी केरळात दाखल झाला.Arrived in Kerala three days ahead of schedule i.e. on 29th May.
राज्यात परतीचा पाऊस १०२ टक्के अधिक ; मुंबई उपनगर, नगर जिल्ह्यांत सर्वाधिक
त्यानंतर आपला प्रवास सुरू ठेवत मॉन्सूनने १६ जून दरम्यान महाराष्ट्र तर २ जुलै रोजी संपूर्ण देशाला व्यापले.त्यात १ जून ते २० सप्टेंबर या कालावधीत देशात ९२५ मिलिमीटर इतका पाऊस पडला. हा सरासरीपेक्षा ६ टक्के जास्त नोंदला गेला. महाराष्ट्रात ही सरासरीपेक्षा २३ टक्के अधिक (१२१९.७)
पावसाची नोंद या वर्षी झाली. मॉन्सूनचे यंदाचे वर्ष देशासाठी चांगले ठरले. देशात २९ मे रोजी आगमन केलेल्या मॉन्सूनने यंदा आपला ४ महिने आणि २५ दिवसांचा मुक्काम पूर्ण केला.तर हंगामातील सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण करत मॉन्सूनने वायव्य भारतातून २० सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला सुरवात केली. त्यानंतर थांबत-थांबत परतीचा प्रवास होत होता. अखेर रविवारी मॉन्सून देशातून परतला.
ऑक्टोबरमध्ये धुव्वाधार : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असताना मॉन्सूने राज्यात धुव्वाधार बॅटींग केली. कोकण, मध्य महाराष्ट्रात तर मुसळधार पावसाची नोंद झाली. दरम्यान १ ते २३ ऑक्टोबरपर्यंत राज्यात सरासरीपेक्षा १०२ टक्के अधिक पाऊस पडला. राज्यात या कालावधीत १३२.३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात ही पावसाने धुमाकूळ घातला होता. ऑक्टोबर महिन्यात रविवारपर्यंत (ता. २३)जिल्ह्यात १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात रविवारपर्यंत १७१.५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.
Published on: 25 October 2022, 05:36 IST