बीड
जुलै महिना संपत आला तरी बीड जिल्ह्यात पावसाने पुरेशी हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याचे चित्र निर्माण झालं आहे. पावसाची वाट पाहून पेरण्या उशिरा झाल्यामुळे मूग आणि उडीद क्षेत्रात घट झाली आहे.
बीड जिल्ह्यातील एकही तालुक्यात अद्यापही शंभर टक्के पाऊस झाला नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. तर अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अद्याप देखील काही शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत.
मात्र, आता पावसाने मोठी उसंत दिल्याने उगवून आलेल्या पिकाला पाण्याची आवश्यकता असून पावसाला जर अशीच उसंत दिली तर शेतकऱ्यांच मोठ नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पावसाने उसंत दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या तर रखडल्याच आहेत. पण पाणी प्रकल्पातील पाणीसाठाही झपाट्याने घटू लागला आहे. दुसरीकडे कृषी विभागाच्या वतीने पावसामध्ये मोठा खंड पडत असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी द्यावे अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
Published on: 18 July 2023, 04:07 IST