News

अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे आज आणि शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Updated on 23 October, 2020 11:16 AM IST


अरबी समुद्राच्या  पश्चिम  मध्य भागात  चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे आज आणि शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात  काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.  बंगाल उपसागराच्या  परिसरात असलेल्या  वाऱ्याची स्थिती मध्य भागात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे.

गुरुवारी हे क्षेत्र आणखी कमी होणार आहे. तर आज त्याची तीव्रता कमी होऊन विरुन  जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उघडीप राहील. त्यामुळे राज्यात ऑक्टोबर महिन्यात हीट वाढणार असून कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे.  खानदेशासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या भागातून केव्हाही परतीचा मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, खानदेशातील धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.  दरम्यान हवामान विभागाच्या मते, देशातील पाच राज्यातही जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. आज नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा मध्ये जोरदार पाऊस होणार आहे. यासह पुढील २४ तासात मुसळधार पाऊस होऊ शकतो.

English Summary: Rainfall forecast in some parts of the state
Published on: 23 October 2020, 11:15 IST