मुंबई : मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला होता. मात्र, पावसाने हुलकावणी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला आहे. पुढील आठवडाभर पाऊस अशीच उसंत घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे.
राज्यात सर्वत्र मोसमी वारे सक्रीय झाले आहेत. मात्र, सहारा भागातून येणाऱ्या धूलिकणांमुळे सध्या ढगांच्या निर्मितीला पोषक वातावरण नाही. त्याचा थेट परिणाम पावसावर झाला असल्याचे हवामान विभागाचे (मुंबई) ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर (Meteorologist K S Hosalikar) यांनी सांगितलं आहे.
यामुळे राज्यात पुढचा आठवडाभर पाऊस पडणार नाही, असे हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. मात्र, विश्रांतीनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Published on: 15 June 2021, 04:15 IST