महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाले आहेत म्हणजेच ढगाळ वातावरणाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूस काही भागांमध्ये तापमानात वाढ झालेली आहे. येईल या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात विजांचा आक्रोशात हलका असा मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे. मागील आठवड्यात सुद्धा असा अंदाज वर्तविला होता जो की खरा ठरला असून महाराष्ट्र राज्यात काही भागांमध्ये पाऊस तर काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. असेच पुढील चार ते पाच दिवसात वातावरण होणार असल्याचे सांगितले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार :-
सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. जे की याचाच परिणाम महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्यासह गुजरात, पूर्व राजस्थान तसेच पश्चिम मध्यप्रदेशात वादळाची आणि विजांच्या कडकड्याची परिस्थिती निर्माण होणार असून काही ठिकाणी तर हलका तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे. मुंबई प्रादेशिक हवामानाने तर काही जिल्ह्यांना अलर्ट सुद्धा जारी केला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांमध्ये या भागात पाऊस पडणार आहे तर काही ठिकानी तापमानात वाढ होणार आहे.
राज्यातील या जिल्ह्यात पाऊस -
महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे, तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम तसेच हलका स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. तर नागपूर, अमरावती, गोंदिया, वर्धा तसेच भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये वादळ ते येणार आहेत पण सोबतच मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. मुंबई च्या प्रादेशिक हवामान खात्याने या सर्व जिल्ह्यांना अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे.
महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी :-
हिंगोली जिल्ह्यामध्ये कालच्या शनिवारी दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले होते जे की त्यानंतर सायंकाळी च्या वेळी साडे सहा वाजताच्या सुमारास हिंगोली मधील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळायला लागल्या होत्या. हंगामात शेतामध्ये हरभरा तसेच हळद पिकाची लागवड आणि अचानक पाऊसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली आहे. सध्या हरबरा शेवटचा टप्पा असून हरभरा काढायला लागला आहे जे की या पावसामुळे हरभरा पिकावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Published on: 07 March 2022, 07:50 IST